Saturday, June 29, 2024

नादच खुळा! सुपरस्टार विजय देवरकोंडाने केला ‘या’ प्रसिद्ध बॉक्सरसोबतचा फोटो शेअर, एकदा पाहाच

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार विजय देवरकोंडा हा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणत सक्रिय असतो. सोशल मीडियावर अनेक घटनांची माहिती तो त्याच्या चाहत्यांना देत असतो. केवळ दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत नाही, तर बॉलिवूडमध्ये देखील त्याचे लाखोंनी चाहते आहेत. सोशल मीडियावर तो अनेकवेळा ट्रेंडिंग फॉलो करत असतो. तो आपल्या आगामी ‘लायगर’ या चित्रपटात झळकणार आहे. यादरम्यान त्याने प्रसिद्ध बॉक्सरसोबतचा एक फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

विजय देवरकोंडाने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्याच्यासोबत प्रसिद्ध बॉक्सर माईक टायसन दिसत आहे. या फोटोमध्ये विजयचा अर्धा चेहरा दिसत आहे. (Actor vijay devarkonda share a photo with Mike Tyson on social media)

हा फोटो शेअर करून त्याने लिहिले आहे की, “प्रत्येक क्षणाच्या मी आठवणी तयार करत आहे आणि हा व्यक्ती शेवटपर्यंत माझ्यासाठी खास असणार आहे.” त्यांचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. अनेकजण या फोटोवर त्याच्या प्रतिक्रिया देत आहेत. सगळेच त्यांच्या ‘लायगर’ या चित्रपटाची वाट पाहत आहे.

‘लायगर’ची निर्मिती धर्मा प्रोडक्शनद्वारे पुरी जगन्नाथ औकर चार्मी कौर यांनी केली आहे. या चित्रपटाची मागील अनेक दिवसांपासून चर्चा चालू आहे. चित्रपटाचा पोस्टर देखील प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात विजय देवरकोंडा आणि माईक टायसन तसेच बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे हे कलाकार असल्याने प्रेक्षकांची या चित्रपटासाठीची उत्सुकता वाढली आहे. या चित्रपटाचे बजेट १२५ कोटी एवढे आहे.

या चित्रपटात रोनित रॉय, रम्या कृष्णन, विष्णू रेड्डी, अली मकरंद, आणि गेटअप श्रीनू हे कलाकार मुख्य भूमिकेत असणार आहे. हा चित्रपट तेलुगू आणि हिंदीमध्ये शूट केला जात आहे. तसेच, इतर भाषांमध्ये देखील डब केला जाणार आहे. हा चित्रपट ९ सप्टेंबर, २०२१ रोजी प्रदर्शित करायचा होता, परंतु कोरोना महामारीमुळे चित्रपटाची शूटिंग थांबण्यात आली होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘विंक गर्ल’ प्रिया प्रकाश वारियरच्या मनमोहक फोटोशूटने वेधले चाहत्यांचे लक्ष, एक नजर टाकाच

-‘बिग बॉस’च्या घरामध्ये लग्न करण्यासाठी सारा खान अन् अली मर्चंटला मिळाले होते लाखो रुपये?

-पिझ्झा खाणारी ‘ही’ विचित्र महिला आहे बॉलिवूडची अभिनेत्री, नाव जाणून तुम्हीही व्हाल अचंबित

हे देखील वाचा