श्वास रोखून धरा! तब्बल १०० कोटी रुपये घेत साऊथ सुपरस्टार ‘विजय देवरकोंडा’ करणार बॉलिवूडमध्ये धमाकेदार एंट्री


तेलुगु भाषेतील ‘अर्जुन रेड्डी’ हा सिनेमा प्रदर्शित झाला आणि बॉक्स ऑफिसवर चक्क पैशांचा पाऊस पडायला सुरुवात झाली. प्रचंड हिट झालेल्या या सिनेमाने दाक्षिणात्य सुपरस्टार ‘विजय देवरकोंडा’ याला जगभर ओळख मिळवून दिली. त्यानंतर तो बॉलिवूडमध्ये देखील तितकाच प्रसिद्ध आणि लोकप्रिय झाला. रविवारी (९ मे) विजय आपला ३२ वा वाढदिवस साजरा करत आहे. विशेष म्हणजे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाचा डंका वाजवलेला विजय बॉलिवूडमध्येही पदार्पण करणार आहे. त्याने १०० कोटी घेत बॉलिवूडमध्ये एंट्री केली आहे.

चित्रपट निर्माता ‘करण जोहर’च्या होम प्रॉडक्शनमध्ये तयार होत असलेल्या ‘लायगर’ या चित्रपटात विजय मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन पुरी जगन्नाथ करत आहेत. विजयने करण जोहरसोबत केवळ एका नव्हे, तर तब्बल तीन चित्रपटांसाठी करार केला असून, त्याला या तिन्ही चित्रपटांसाठी त्याला १०० कोटी रुपये मिळाल्याचे वृत्त आहे.

प्राप्त माहितीनुसार, करण जोहरने विजयशी तीन सिनेमांचा करार केला आहे. करण विजयला सुमारे १०० कोटी रुपये देणार आहे. त्यांच्या करारानुसार विजयला करणच्या धर्मा प्रॉडक्शन बॅनरखाली तीन चित्रपट करावे लागणार आहेत. शिवाय करण विजयसोबत अजून पॅन-इंडिया आणि बॉलिवूड चित्रपट देखील बनवणार असल्याचे समजत आहे.

करणने त्याच्यासोबत पहिल्या सिनेमाची घोषणा देखील केली आहे. त्याने १७ जानेवारीला ट्वीट करत ‘लायगर’ चित्रपटाची घोषणा आणि पोस्टर प्रदर्शित केले आहे. पोस्टरनुसार हा सिनेमा बॉक्सिंगवर आधारित असल्याचे दिसत आहे. या सिनेमात विजय सोबत अनन्या पांडे दिसणार आहे.

विजयने देखील हे पोस्टर शेयर केले आहे.

विजयच्या फॅन्समध्ये या घोषणेमुळे उत्साहाचे वातावरण आहे. आता हा सिनेमा कधी प्रदर्शित होणार हे पाहावे लागेल. विजयने ‘गीता गोविंदम’ आणि ‘डिअर कॉम्रेड’ यांसारखे हिट चित्रपट दिले आहेत.

हेही वाचा-

-अंडरवर्ल्ड डाॅन छोटा राजनमुळे ‘या’ अभिनेत्रीच्या करियरचे वाजले होते तीन-तेरा, प्रेमापायी…

-किंग खानपासून ते फिट अभिनेत्री शिल्पा शेट्टीपर्यंत ‘या’ दिग्गज कलाकारांनी केला अपत्यप्राप्तीसाठी सरोगसीचा वापर


Leave A Reply

Your email address will not be published.