Monday, June 9, 2025
Home बॉलीवूड ‘शाहरुख, तू शेवटचा सुपरस्टार नाही…’, विजय देवरकोंडाने का केले खळबळजनक वक्तव्य?

‘शाहरुख, तू शेवटचा सुपरस्टार नाही…’, विजय देवरकोंडाने का केले खळबळजनक वक्तव्य?

साऊथचे कलाकार बॉलिवूडमध्ये एन्ट्री करत आहेत. यामध्ये विजय देवरकोंडा याचाही समावेश आहे. विजयने ‘लायगर’ या सिनेमातून बॉलिवूड पदार्पण केले आहे. हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी चांगली कामगिरी केली. मात्र, दुसऱ्या दिवशी सिनेमाच्या कमाईत मोठी घट झाल्याचे बोलले जात आहे. या सिनेमाचे रिव्ह्यूदेखील खूप खास नसल्याचे बोलले जात आहे. अशात सोशल मीडियावरही सिनेमा बॉयकॉट करण्याची मागणी केली जात आहे. अशात विजयचे एक जुने वक्तव्य व्हायरल होत आहे, जे त्याच्या अडचणीत वाढ करत आहे. नेटकरीही त्याला जोरदार ट्रोल करत आहेत.

अभिनेता विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) याचे एक जुने ट्वीट व्हायरल होत आहे. या ट्वीटमध्ये त्याने म्हटले होते की, त्याचा सिनेमा आरामात 200 कोटींची कमाई करेल. याव्यतिरिक्त त्याने एका मुलाखतीत असेही म्हटले होते की, शाहरुख खान (Shahrukh Khan) याच्यानंतर तो पुढचा स्टार बनणार आहे. अशात त्याचे हे ट्वीट आणि त्याच्या जुन्या मुलाखतीची थट्टा उडवली जात आहे. विजयने एका मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते की, शाहरुखकडून त्याला त्याचे स्वप्न पूर्ण करण्याची प्रेरणा मिळते. तो म्हणाला होता की, “जर तो असे करू शकतो, तर मी का नाही करू शकत?”

यासोबतच त्याने शाहरुखच्या त्या मुलाखतीबद्दलही चर्चा केली होती, ज्यात तो म्हणाला होता की, तो इंडस्ट्रीचा शेवटचा सुपरस्टार असेल. यावर विजय म्हणतो की, “जेव्हा मी त्यांची ही मुलाखत पाहिली, मला आठवते की, मला असे म्हणायचे होते की, शाहरुख तू चुकीचा आहे. तू शेवटचा नाहीये, मी येत आहे.”

अशात विजयचे हेच वक्तव्य त्याची थट्टा उडवत आहे. विजयच्या या वक्तव्यावर सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. एकाने म्हटले आहे की, “1-2 हिट सिनेमे दिल्याने स्वत:ला सुपरस्टार समजतोय.”

‘लायगर’ सिनेमा
विजयचा ‘लायगर’ हा सिनेमा 25 ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. त्याच्यासोबत या सिनेमात अभिनेत्री अनन्या पांडे मुख्य भूमिकेत आहे. तसेच, राम्या कृष्णन आणि रोनित रॉय हेदेखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. या सिनेमासाठी विजयने जवळपास 35 कोटी रुपये घेतल्याचे सांगितले जात आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-
खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांवर राजूचे कुटुंब संतापले, उचलले मोठे पाऊल
सोनालीवर ताबा मिळवण्यासाठी तांत्रिकाचा वापर करायचा सुधीर सांगवान, जवळच्या व्यक्तीचा खळबळजनक दावा
तब्बल १२०० कोटींच्या ‘केजीएफ २’ सिनेमातील ‘या’ अभिनेत्याला झालाय कँसर, सूज लपवण्यासाठी वाढवली दाढी

हे देखील वाचा