Monday, July 1, 2024

‘लायगर’ फ्लाॅप झाल्याने विजय देवराकोंडा अडचणीत; ‘या’ चित्रपटाची रिलीज तारीख ढकलणार पुढे

एकीकडे हिंदी सिनेसृष्टीत अनेक चित्रपट फ्लाॅप हाेत असल्याचे बघायला मिळत आहे तर दुसरीकडे साउथचे चित्रपट प्रेक्षकांच्या ह्रदयात स्थान निर्माण करताना दिसत आहे. अशातच फिल्ममेकर्सने डाेक लढवत नवीव युक्ती काढली. फिल्ममेकर्सने साउथ चित्रपटाच्या अभिनेत्यांना आपल्या चित्रपटात घेऊन कास्ट करण्याचा निर्णय घेतला. परिणामी विजय देवराकोंडा आणि अनन्या पांडे यांचा ‘लायगर’ ह्या चित्रपट बनवण्यात आला. चित्रपटाचे प्रमाेशन माेठ्या प्रमाणात करण्यात आले.

परंतु तरी देखील चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर मार खाल्ला. परिस्थीती इतकी वाईट झाली की, सिनेमागृहात चित्रपट चालण अवघड झाले. विजय देवराकोंडाचा (Vijay Deverakonda) लायगर (Liger) चित्रपट फ्लाॅप झाल्यानंतर त्याचा आगामी चित्रपट ‘जन गण मन’ काही वेळासाठी होल्ड करण्यात आला.

सुत्रानुसार माहिती मिळाली की, लायगर चित्रपट फ्लाॅप झाल्याने ‘जन गण मन’ चित्रपट काही काळाकरीता बनवण्याचा थांबवण्यात आला आहे. जन गण मन चित्रपट आॅगस्ट 2023 पर्यंत रिलीज करण्यात येणार हाेता पंरतु लायगर चित्रपट फ्लाॅप झाल्यान निर्मात्याकडुन चित्रपटाची तारीख पुढे ढकलण्यात आली.

विजय देवराकोंडा आणि अनन्या पांडे यांचा ‘लायगर’ ह्या चित्रपट फक्त 35 करोड रुपयाची कमाई करु शकला. चित्रपटाला घेऊन साेशल मिडियावर बायकॉट ट्रेंड चालवण्यात आला हाेता. त्यामुळे याचा परीणाम सिनेमागृहावर देखील हाेताना दिसला. बॉक्स ऑफिसवर येणारे अनेक चित्रपट बायकॉटचा शिकार हाेताना दिसत आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
वेबसिरीजमधून उलघडणार राजीव गांधींच्या हत्येचा थरार, ‘या’ दिग्गज दिग्दर्शकाने घेतली जबाबदारी
विचित्र ड्रेस घातल्याने रुबिना दिलैक झाली ट्रोल; नेटकरी म्हणाले, ‘दुसरी उर्फीच…’
गायक नाहीतर ‘हे’ होते हार्डी संधूचे स्वप्न, एका अपघाताने बदलला निर्णय

हे देखील वाचा