Monday, July 1, 2024

दक्षिणेतील विक्रमीवर अभिनेता विक्रमचा आज बड्डे, त्याचे हे पाच चित्रपट प्रत्येकाने पाहायलाच हवेत!

दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीमध्ये असे अनेक अभिनेते आहे, ज्यांनी अभिनयाच्या जोरावर सगळ्या प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. या अभिनेत्यांचे कोणतेही चित्रपट येता क्षणीच सुपरहिट झाले आहेत. या अभिनेत्यांमध्ये समावेश‌ होतो तो म्हणजे अभिनेता विक्रम. त्याने अनेक सुपरहिट चित्रपट करून चित्रपट सृष्टीमध्ये त्याचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्याचे नाव आज जरी समोर आले तरी सगळ्यांच्या डोळ्यासमोर त्यानी निभावलेली अनेक पात्रं त्याचा अभिनय या सगळ्या गोष्टी येतात. आज विक्रमचा वाढदिवस आहे. जाणून घेवूया त्याच्या आयुष्यातील हे काही सुपरहिट चित्रपट.

सेतू
विक्रमचा 1999 मध्ये सेतू हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात त्याची एका प्रेमवीराची भूमिका होती. जो वेड्याप्रमाणे त्याच्या प्रेयसीवर प्रेम करत होता. नंतर या चित्रपटात त्याला वेड लागलेले देखील दाखवले आहे. चित्रपटासाठी त्याला अनेक पारितोषिकं मिळाली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन ‘बाला’ यांनी केले आहे. जर या चित्रपटाचा पोस्टर बघून तुम्हाला सलमान खानची आठवण आली असेल, तर अगदी बरोबर. कारण सेतू या चित्रपटाचा हिंदी रीमेक ‘तेरे नाम’ आहे. तेरे नाम या चित्रपटात सलमान खान आणि भूमिका चावला यांनी मुख्य भूमिका निभावली होती.

पीथमगन
पीथमगन या चित्रपटात विक्रम सोबत अभिनेता सूर्या हा देखील होता. हा चित्रपट ड्रग्सवर आधारित होता. 2003 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन देखील ‘बाला’ यांनी केले होते. या चित्रपटातील विक्रमची भूमिका इतकी दमदार होती की, त्याला या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.

कासी
कासी हा चित्रपट 1999 मध्ये मल्याळम भाषेत प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाच्या यशानंतर हा चित्रपट तमिळ भाषेत बनवला गेला. यामध्ये विक्रम हा मुख्य भूमिकेत होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन विनयन यांनी केले होते. विक्रमने या चित्रपटात एका आंधळ्या व्यक्तीची भूमिका निभावली होती.

आय(I)
विक्रमचा ‘आय’ हा चित्रपट 2015 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात त्याने एका बॉडी बिल्डरची भूमिका निभावली होती. यामध्ये त्याच्या शरीरावर एका विषाणूचा परिणाम होतो. यामुळे त्याला त्वचा रोग होतो आणि तो म्हतारा दिसू लागतो. या चित्रपटातील त्याचे पात्र प्रेक्षकांना खूपच आवडले होते.

हे देखील वाचा