Wednesday, July 3, 2024

कंगनाच्या ‘त्या’ वक्तव्याचं ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्याकडून समर्थन, म्हणाले, ‘योद्ध्यांना फाशी…’

सध्या चित्रपटसृष्टीत एक विषय चांगलाच चर्चेत आहे, तो म्हणजे कंगना रणौतचे स्वातंत्र्यावरील वादग्रस्त वक्तव्य होय. कंगनाच्या वक्तव्याने चांगलाच वाद पेटला आहे. कंगनाला चोहोबाजूंनी टीकेचा सामना करावा लागत आहे. मात्र, अशातच आपल्या अभिनयाने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी कंगनाच्या स्वातंत्र्यावरील वक्तव्याचे समर्थन केले आहे. मात्र, यामुळे चांगलाच वाद पेटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

काय होते कंगनाचे वक्तव्य?
कंगनाने इंस्टाग्राम स्टोरीवर ट्रोलर्सला प्रत्युत्तर दिले होते. कंगनाने वादग्रस्त वक्तव्य करत म्हटले होते की, “१९४७ मध्ये मिळालेले स्वातंत्र्य ‘भीक’ होते आणि जे स्वातंत्र्य मिळाले आहे ते २०१४ मध्ये मिळाले आहे.”

विक्रम गोखलेंचा कंगनाच्या वक्तव्याला पाठिंबा
पुण्यात ७५ व्या वाढदिवसानिमित्त ब्राह्मण महासंघाच्या वतीने ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांना गौरवण्यात आले. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. माध्यमांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले. यादरम्यान त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचेही कौतुक केले. (Actor Vikram Gokhale Says I Agree With Kanganas Statement The Country Got Its Freedom From Begging)

कंगनाच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना अभिनेते म्हणाले की, “कंगना रणौत जे म्हणालेली आहे की, ते भीक मागूनच मिळालेलं आहे, यावर मी सहमत आहे. हे दिलेलं गेलं आहे बरं का. हे ज्या योद्ध्यांनी मिळवण्याचा प्रयत्न केला, त्या योद्ध्यांना फाशी जाताना मोठमोठे लोक बघत राहिले. त्यांना वाचवलं नाही त्यांनी. आपल्या देशाचे हे लोक ब्रिटिशांविरुद्ध उभे राहत आहेत, हे बघून सुद्धा त्यांना फाशीपासून वाचवलं नाही, असेही लोक केंद्रीय राजकारणात होते. भरपूर वाचलेलं आहे मी.”

भाजप आणि शिवसेनेच्या युतीबाबत काय म्हणाले गोखले?
“भाजप आणि शिवसेनेने पुन्हा एकत्र यावे. मी देवेंद्र फडणवीस (विरोधी पक्षनेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री) यांना समान वर्षे मुख्यमंत्रीपद देण्याच्या अटीवर दोन्ही पक्षांमधील संभाव्य युतीबाबत प्रश्न केला. दोन्ही पक्षांनी लोकांचा विश्वास जिंकण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. मला वाटते की, राजकीय पक्षांनी लोकांना फसवू नये. कारण लोक त्यांना शिक्षा करू शकतात,” असे भाजप आणि शिवसेना पक्षाबाबत बोलताना गोखले पुढे म्हणाले.

विक्रम गोखले यांना मराठी रंगभूमी, बॉलिवूड आणि टेलिव्हिजनमधील त्यांच्या भूमिकांसाठी ओळखले जातात.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘पंगा क्वीन’ कंगनाने भारताच्या फाळणीवर प्रश्न केले उपस्थित, म्हणाली, ‘आपण स्वातंत्र्य सैनिकांचा…’

-‘…तर मी माझा पद्मश्री पुरस्कार परत करेल’, स्वातंत्र्याबाबतच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर पुन्हा बरळली कंगना

-‘भीक’चे वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर कंगनाने शेअर केला तिचा ग्लॅमरस फोटो; म्हणाली, ‘एक गाणे…’

हे देखील वाचा