Friday, August 1, 2025
Home बॉलीवूड बॉलिवूडमधील ‘हा’ खलनायक केवळ डोळ्यांनीच करत होता सेनेसृष्टीवर राज्य, वाचा त्याचा खास जीवनप्रवास

बॉलिवूडमधील ‘हा’ खलनायक केवळ डोळ्यांनीच करत होता सेनेसृष्टीवर राज्य, वाचा त्याचा खास जीवनप्रवास

बॉलिवूडमध्ये चित्रपटात काम करताना दोन व्यक्तिरेखा खूप लोकप्रिय होतात. एक म्हणजे नायकाची भूमिका निभावले कलाकार आणि दुसरा म्हणजे खलनायकाची भूमिका निभावलेली कलाकार. आजकाल चित्रपटात बघायला गेले तर, मुख्य पात्रापेक्षाही खलनायक दिसायला खूपच हँडसम असतो. त्यामुळे त्यांच्याकडे बघून कोणीही म्हणणार नाही की, हे खलनायक आहेत. पण एक काळ असा होता जेव्हा चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेसोबतच त्याचा लूक एवढा खतरनाक असायचा की, प्रेक्षक त्याला पाहता क्षणीच ओळखायचे की, हा या चित्रपटातील खलनायक आहे. बॉलिवूडमध्ये असाच एक खलनायकाची भूमिका साकारणारा अभिनेता आहे, जो केवळ त्याच्या डोळ्यांनीच दहशत पसरवत होते, ते म्हणजे एन सिंग.

हिंदी चित्रपट सृष्टीतीलले कलाकार निरंजन सिंग आज त्यांना एन सिंग या नावाने देखील ओळखतात. के एन सिंग यांचा जन्म १ सप्टेंबर १९०८ रोजी डेहराडून मध्ये झाला आहे. त्यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड असल्याने, त्यांनी बॉलिवूडमध्ये ‘सुनहरा संसार’ या चित्रपटातून त्यांच्या करिअरला सुरुवात केली. हा चित्रपट १९३६ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात त्यांनी एका डॉक्टरची छोटीशी भूमिका निभावली होती.

त्यानंतर एन सिंग यांनी चित्रपटात जास्त खलनायकाची भूमिका निभावली आहे. परंतु त्यांचे विचार कोणत्या नायकापेक्षाही कमी नव्हते. ते त्या काळच्या विविध गुणसंपन्न असणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक होते. तसेच ते येणाऱ्या पिढीला देखील प्रेरणा देत असायचे. एका मुलाखतीत एन सिंग यांना विचारले होते की, येणाऱ्या कलाकारांबद्दल तुम्हाला काय सांगावेसे वाटते. यावर त्यांनी उत्तर दिले होते की, ” आमच्या काळातील जेवढे काही जुने कलाकार होते त्यापैकी कोणीच हा विचार केला नव्हता की, उद्या काय होईल. परंतु आताची मुले खूप समजदार आहेत. त्यांनी त्यांच्या येणाऱ्या दोन पिढ्यांची सोय केली आहे. ही गोष्ट खूप कौतुकास्पद आहे.”

याच मुलाखतीत एन सिंग यांनी त्यांचे जवळचे मित्र पृथ्वीराज जी, साण्याल साहब, सहगल साहब याच्या सोबतचा एक किस्सा शेअर केला होता . त्यांनी सांगितले की, “माझ्या घरी नेहमीच खूप माणसे येत असायची. अशाच एका रात्री खूप जण माझ्या रूममध्ये बसले होते. जवळपास रात्रीचे 2 वाजले होते आणि सहगल साहब कोणतेतरी गाणे गुणगुणत होते. माझ्या खोलीत सिगारेटचा खूप धूर झाला होता, त्यामुळे मी उठून पडदे बाजूला सारले. तेव्हा मला ही गोष्ट समजली की, तिथे जेवढे लोक आहेत ते सगळे सहगल साहब यांचे गाणे ऐकण्यासाठी बसले आहेत.”

एन सिंग यांनी त्यांच्या करीअरमध्ये २०० चित्रपटात काम केले आहे. ते असे खलनायक होते जे त्यांच्या डायलॉग पेक्षा त्यांच्या डोळ्यांनीच सगळ्यांनी पळती भुई थोडी करून टाकत होते. त्यांचा आवाज, स्टाईल आणि डोळ्यांनी सगळ्यांच्या मनावर एक खलनायक म्हणून अधिराज्य गाजवले होते. त्यांनी ‘बागबान’, ‘सिकंदर’, ‘हावडा ब्रीज’ ‘एन इविनींग इन पॅरिस’ सारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. चित्रपटात अनेकांच्या मनावर राज्य करणाऱ्या या अभिनेत्यासोबत शेवटच्या क्षणी मात्र कोणीच नव्हते. ३१ जानेवारी २००० साली मुंबईमध्ये त्यांनी शेवटचा श्वास घेतला.

हे देखील वाचा