शहनाज गिल (shehnaaz gill)कौर ‘बिग बॉस’मुळे खूप चर्चेत आली होती. तिची बिग बॉस विजेता सिद्धार्थ शुक्लासोबतची मैत्री आणि भांडण प्रेक्षकांना इतके आवडले की चाहते तिला प्रेमाने सिदनाज म्हणतात. शहनाज सोशल मीडियावर देखील अनेकदा चर्चेत असते. मात्र, यावेळी तिचं चर्चेत असण तिच्यासाठी घातक ठरू शकते. नुकताच तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तिचा स्वभाव पाहून चाहते खूप दुखावले आहे आणि तिला ट्रोल करत आहे.
आता शहनाज गिल (Shehnaaz Gill) एका व्हिडिओमुळे चर्चेत आली आहे. यामध्ये तिची वागणुक चाहत्यांना आवडला नाही परिणामी त्यांनी शहनाजला अहंकारी म्हटले. तर झाले असे की, शहनाज सेटवरून व्हॅनिटी व्हॅनमध्ये परतत होती. दरम्यान, पॅपराजीने तिला फोटो काढण्यासाठी थांबविले पण शहनाज म्हणाली की, “अहो, नंतर भेटू. मी आता काम करत आहे.” एवढेच नाही तर जेव्हा पॅपराजीने शहनाजला तू कशी आहेस असे विचारले, तेव्हा शहनाज मागे वळून म्हणाली की, “माझी तब्येत ठीक नाही, तर तू काय करशील? औषध देणार का?” यामध्ये कोणीतरी मागून म्हणतो की तो प्रार्थना करेल. मग ती म्हणते “तू प्रार्थना का करणार”. शहनाजची ही शैली थोडी उद्धट वाटली आणि चाहत्यांनी तिला अहंकारी म्हटले.
View this post on Instagram
एका यूजरने लिहिले की एवढा एटिट्यूड, इतका अहंकार का?. तिचे हे रूप बिग बॉसमध्येही पाहायला मिळाले होते, तेव्हाच तिला सलमान खानने याबाबत थोडी काळजी घेण्यास सांगितले होते. त्याचवेळी एका यूजरने लिहिले की, ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे. या पोस्टच्या कमेंट बॉक्समधला एटिट्यूड बघा, बाप रे, अशा अनेक कमेंट्स आहेत. तर काही युजर्सनी शहनाजला सपोर्ट करत कमेंट केली की, अनेकांना शहनाजच्या आनंदाचा हेवा वाटतो.
गेल्या 2 वर्षात शहनाजला मिळालेल्या लोकप्रियतेने तिला एका मोठ्या स्टारच्या यादीत स्थान मिळवून दिले आहे, तर आतापर्यंत ती कोणत्याही बॉलिवूड प्रोजेक्टमध्ये दिसली नाही, परंतु बॉलिवूडच्या टॉप सेलेब्समध्येही तिची खूप चर्चा आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
सोळाव्या वयातच रणबीरच्या बहिणीला आल्या होत्या चित्रपटांच्या ऑफर्स, ‘या’ कारणामुळे इंडस्ट्रीपासून राहिली दूर
‘ब्रह्मास्त्र’ सिनेमात आलियाने केला ‘चिकनी चमेली’वर डान्स; नेटकरी म्हणाले, ‘माफी मागा कॅटरिनाची’
सुनील शेट्टीने ‘हेरा फेरी’ अंदाजात अक्षयला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा! तुम्हीही म्हणाल, ‘लय भारी’