Wednesday, July 3, 2024

बॉलिवूडमधील असे कलाकार ज्यांना लाभलीय लष्करी पार्श्वभूमी; सुष्मितापासून ते प्रियांकापर्यंत ‘यांचा’ आहे समावेश

बॉलिवूडमध्ये अशी अनेक स्टारकिड्स आहेत, ज्यांना जन्मापासूनच अभिनयाचे धडे आणि चित्रपटांचा वारसा मिळाला आहे. त्याचबरोबर काही कलाकार असेही आहेत ज्यांना भारतीय लष्कराची पार्श्वभूमी लाभलेली आहे. जिथे मुलांना लहानपणापासून शिस्त शिकवली जाते. असे असूनही, देशातील सर्वात प्रसिद्ध कलाकारांच्या यादीत या कलाकारांचा समावेश आहे. हे असे अभिनेते-अभिनेत्री आहेत ज्यांनी कोणत्याही गॉड फादरशिवाय बॉलिवूडमध्ये आपले नाव कमावले आहे. लष्करी पार्श्वभूमी किंवा लष्करी कुटुंबांसंबंधित हे कलाकार स्वतःला ‘आर्मी ब्रॅट्स’ म्हणवतात. बॉलिवूडमधील अशा काही कलाकारांविषयी जाणून घेऊया, ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी सीमेवर देशाचे रक्षण केले आहे. इतकेच नव्हे तर देशासाठी त्यांचे प्राणही त्यागले आहेत.

सुष्मिता सेन
सुष्मिता सेनचे वडील विंग कमांडर शुबीर सेन हे भारतीय हवाई दलात होते. जरी आता ते निवृत्त झाले असले, तरी आजही ते शिस्तबद्ध जीवन जगत आहेत. (Actors in Bollywood who have a military background)

प्रीति झिंटा
प्रीति झिंटाचे वडील दुर्गानंद झिंटा लष्करात अधिकारी होते. पण प्रीतिच्या वडिलांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. त्यावेळी प्रीती केवळ १३ वर्षांची होती. या अपघातात तिची आई देखील गंभीर जखमी झाली होती. सध्या प्रीतिचा भाऊ दिपांकर हा सुद्धा भारतीय लष्करात अधिकारी आहे.

अक्षय कुमार
अक्षय कुमारचेही लष्कराशी खूप घनिष्ट नाते आहे. दिल्लीत जन्मलेले अक्षय कुमारचे वडील हरी ओम भाटिया हे लष्कराचे सैनिक होते. त्यानंतर त्यांनी ही नोकरी सोडली होती. अमृतसरहून दिल्लीला आल्यानंतर त्यांनी युनिसेफमध्ये अकाउंटेंट म्हणून काम करण्यास सुरुवात केली. अक्षयचे वडील सैन्यात होते, त्यामुळे त्याचे बालपण स्पोर्ट्स खेळण्यात गेले. अक्षय लष्कराच्या पार्श्वभूमीमुळे खूप शिस्तबद्ध आहे.

अनुष्का शर्मा
अनुष्का शर्माचे वडील कर्नल अजयकुमार शर्मा हे देखील सैन्यात असल्याने त्यांची देशभरात अनेक ठिकाणी बदली होत असत. अनुष्काचा जन्म अयोध्येत झाला होता. अनुष्काचे वडील जेव्हा भारतीय सैन्यातून निवृत्त झाले, तेव्हा ते कर्नल पदभार सांभाळत होते.

प्रियांका चोप्रा

प्रियांका चोप्राचे वडील अशोक आणि आई मधू, दोघेही भारतीय सैन्यात डॉक्टर म्हणून कार्यरत होते. त्यामुळे लहानपणापासूनच प्रियांका आणि तिच्या भावाला शिस्तीत राहायला शिकवले गेले होते. २०१३ साली अशोक चोप्रा यांचे कर्करोगामुळे निधन झाले होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-शास्त्रीजींच्या सल्ल्यावरून मनोज कुमारांनी बनवला हिट चित्रपट, त्यातल्या ‘मेरे देश की धरती सोना उगले…’ गाण्याने तर गाजवला काळ

-ही आहे हॉलिवूडमधील सर्वाधिक श्रीमंत कलाकारमंडळी, संपत्तीचा आकडा पाहून तुम्हीही व्हाल दंग

-‘काश माझी मुलं त्यांना भेटू शकली असती…’ वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त रितेश झाला भावुक; मुलांसोबत वाहिली श्रद्धांजली

हे देखील वाचा