Wednesday, June 26, 2024

वरुण धवनपूर्वी ‘या’ कलाकारांचं कापण्यात आलंय चलन, एकाला तर भरावे लागले २९ लाख

कानपूरमध्ये ‘बवाल’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान बॉलिवूड अभिनेता वरुण धवनचे (Varun Dhawan) चलन कापण्यात आले. त्याने हेल्मेट घातले नव्हते आणि कानपूरच्या रस्त्यांवर बनावट नंबर प्लेट लावून बुलेट चालवत होता, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यानंतर पोलिसांनी वरुणचे चलन कापले आहे. वाहतुकीचे नियम न पाळल्याबद्दल एखाद्या अभिनेत्याला दंड ठोठावण्याची ही पहिलीच वेळ नसली, तरी याआधीही अनेक कलाकारांना त्यांच्या निष्काळजीपणाचा फटका सहन करावा लागला आहे.

अल्लू अर्जुन (Allu Arjun)
अल्लू अर्जुनने ‘पुष्पा’ चित्रपटात अनेक नियमांचे उल्लंघन केले आहे. त्यानंतर तो खऱ्या आयुष्यातही नियम तोडताना आढळला. यामुळे हैदराबाद पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केली. त्याच्या लँड रोव्हर रेंज लक्झरी एसयूव्ही कारचे हैदराबाद पोलिसांनी चलन कापले. त्यासाठी त्याला ७०० रुपये दंड भरावा लागला होता. (actors in legal trouble before varun dhawan these actors were also fined for violating traffic rules)

नागा चैतन्य (Naga Chaitanya)
अभिनेता नागा चैतन्यचाही नियमांचे उल्लंघन करण्यात सहभाग आहे. तो काळ्या काचेच्या वाहनातून प्रवास करत होता आणि याच दरम्यान हैदराबाद पोलिसांनी त्याला रस्त्यात अडवून चलन कापले. आपली चूक मान्य करत त्याने ७१५ रुपयांचे चलन भरले आणि गाडीची काळी काच काढू, असे आश्वासन दिले.

डॅनी डेन्झोंगपा (Danny Denzongpa)
अभिनेता डॅनी डेन्झोंगपा यांना रोड टॅक्स न भरल्याबद्दल महाराष्ट्र आरटीओने २९ लाख रुपयांचा दंड ठोठावला होता. सिक्कीममध्ये नोंदणीकृत रेंज रोव्हर कार ते मुंबईत चालवत असल्याने त्यांना दंड ठोठावण्यात आला होता.

या सर्वांशिवाय हैदराबाद पोलिसांनी कल्याण राम (Kalyan Ram), ज्युनियर एनटीआर (Jr NTR) आणि तेलुगू दिग्दर्शक त्रिविक्रम श्रीनिवास यांना गाडीला काळ्या काचा लावल्याबद्दल मोठ्या प्रमाणावर चलन कापले होते. त्याचवेळी रवी तेजालाही (Ravi Teja) दंड ठोठावण्यात आला होता.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा