Saturday, June 29, 2024

ओटीटीने सावरली ‘या’ कलाकारांची कारकीर्द; मराठमोळ्या अभिनेत्रीचाही समावेश

बॉलिवूड विश्वात आपल्याला असे अनेक कलाकार पाहायला मिळतील, ज्यांना कित्येक वर्ष चित्रपटांत काम करून देखील फारशी ओळख मिळाली नाही. मात्र, त्यांनी ओटीटीच्या जगात पाऊल ठेवताच त्यांचे नशीब बदलले. त्यांना या ओटीटीच्या माध्यमातून ओळख मिळाली आहे. या यादीत अनेक मोठमोठ्या कलाकारांचाही समावेश आहे. नवाजुद्दीन सिद्दीकी देखील अशाच एका कलाकारापैकी आहे. आता त्याने ओटीटी प्लॅटफॉर्म सोडला आहे, पण आजही असे अनेक कलाकार आहेत, जे डिजिटल प्लॅटफॉर्मवर चमत्कार करण्यात मग्न आहेत. हे असे कलाकार आहेत, ज्यांची कारकीर्द ओटीटीमुळे पुन्हा रुळावर येण्यास मदत झाली. चला तर मग या यादीत कोणकोणत्या कलाकारांचा समावेश आहे हे जाणून घेऊया.

जयदीप अहलावत
जयदीप अहलावत गेल्या दशकापासून चित्रपटसृष्टीचा एक भाग आहेत. त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक उत्कृष्ट चित्रपट दिले आहेत. मात्र, त्यांना त्याच्या ‘पाताल लोक’ या वेबसीरिजमुळे चर्चेत येण्याची संधी मिळाली. जयदीप यांनी हाथीराम चौधरीच्या भूमिकेतून सिद्ध केले की, ते एक अप्रतिम अभिनेता आहेत.

पंकज त्रिपाठी
‘मिर्झापूर’ या वेबसीरिजमधील पंकज त्रिपाठींचे काम इतके अप्रतिम होते की, खऱ्या आयुष्यातही त्यांचे नाव कार्पेट ब्रदर झाले आहे. पंकज यांनी २००४ साली ‘रन’ या चित्रपटातून कारकिर्दीला सुरुवात केली होती. मात्र, ‘मिर्झापूर’नेच पंकज यांनी त्यांची खरी ओळख मिळवून दिली.

दिव्येंदू शर्मा
‘प्यार का पंचनामा’ या चित्रपटातून पदार्पण बॉलिवूडमध्ये करणाऱ्या दिव्येंदू शर्माला त्याचा सहकलाकार कार्तिक आर्यनइतके यश इंडस्ट्रीत मिळाले नाही. अशा परिस्थितीत ‘मिर्झापूर’नेही दिव्येंदूची कारकीर्द बदलण्यास मदत केली आहे. ‘मुन्ना भैया’च्या पात्राने दिव्येंदूला खूप प्रेम दिले होते.

प्रतीक गांधी
‘स्कॅम १९९२’ ही वेबसीरिज आली नसती, तर प्रतीक गांधींसारख्या अतुलनीय कलाकाराविषयी जाणून घ्यायला अजून वेळ लागला असता. हंसल मेहतांनी बनवलेल्या या वेबसीरिजमध्ये प्रतीकने अप्रतिम काम केले आहे. त्यानंतरच त्याला बॉलिवूडमधून ऑफर येऊ लागल्या. आज देशभरातील प्रतिभावान अभिनेत्यांमध्ये प्रतीक गांधींचे नाव घेतले जाते.

राधिका आपटे
मराठमोळी अभिनेत्री राधिका आपटेने नेटफ्लिक्सच्या अनेक शो आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे की, ती सहजपणे डिजिटल चॅनेलची ब्रँड एंबेसेडर बनू शकते. राधिका ‘सेक्रेड गेम्स’पासून ‘घौल’ आणि ‘रात अकेली है’पर्यंत अनेक उत्कृष्ट प्रोजेक्टमध्ये दिसली होती. राधिका केवळ तिच्या नेटफ्लिक्स प्रोजेक्टमुळे प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचली आहे.

बॉबी देओल
बॉबी देओलने भलेही ‘रेस ३’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये दुसऱ्या इनिंगमध्ये पदार्पण केले असेल, पण ‘आश्रम’ या प्रसिद्ध वेबसीरिजद्वारे तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या मालिकेत बॉबी देओलचं काम इतकं चांगलं आहे की, आता या मालिकेचा तिसरा भाग येत असून त्याच्या चर्चा सर्वत्र होत आहेत.

अमित साध
अमित साधने टीव्ही इंडस्ट्रीपासून बॉलिवूडपर्यंत अनेक चांगल्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.

मात्र, ‘ब्रीद’ या वेबसीरीजमधून त्याला वेगळी ओळख मिळाली. सीरीजमधील त्याच्या अभिनयापासून ते त्याच्या हँडसम लूकने चाहते थक्क झाले होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-प्रभावी अभिनेत्री असणाऱ्या टिस्का चोप्राने अनेक शॉर्ट फिल्म्सचे लिखाण करत स्वतःला सिद्ध केले उत्तम लेखिका

-वयाच्या पंधराव्या वर्षी फिल्मफेयरने सन्मानित झालेल्या पद्मिनी कोल्हापुरे यांनी एकविसाव्या वर्षी पळून जाऊन केले होते लग्न

-कोणी उडवला थरकाप, तर कोणी पाडली भुरळ; पाहा ‘या’ अभिनेत्रींचा लक्षवेधी ‘हॅलोविन लूक’

हे देखील वाचा