Monday, July 1, 2024

‘या’ बॉलिवूड कलाकारांनी गाजवले आहे राजकारणाचे मैदान, जाणून घ्या संपूर्ण लिस्ट

हिंदी चित्रपटसृष्टीतील असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी अभिनयात यशस्वी झाल्यानंतर राजकारणात प्रवेश केला. त्यांच्या या राजकिय प्रवेशात अनेकांना यश मिळाले तर काहीजण पूर्ण अपयशी ठरले. आजपर्यंत अनेकांनी राजकारणात आले नशीब आजमावून पाहिले आहे. आज पाहूया असेच कलाकार ज्यांनी अभिनय क्षेत्रासह राजकारणात आपला चांगलाच ठसा उमटवला आहे.

हेमा मालिनी – हिंदी चित्रपट जगतातील ड्रीमगर्ल म्हणून हेमा मालिनी यांना ओळखले जाते. आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने हेमा मालिनी यांना सगळ्यांनाच मोहित केले होते. त्यांनी राजकारणात सर्वप्रथम गुरदासपूर मतदार संघातून भाजपा पक्षाचे उमेदवार राजेश खन्ना यांचा प्रचार केला होता. 2004 पासून त्या भारतीय जनता पक्षाच्या सदस्या असून मथुरा मतदार संघाच्या त्या विद्यमान खासदार आहेत.

धर्मेंद्र – हिंदी चित्रपट जगतातील आघाडीचे अभिनेते असलेले धर्मेंद्र यांनीही राजकारणाच्या मैदानात आपले नशीब आजमावून पाहिले आहे. ते राजकिय विश्लेषकसुद्धा आहेत. धर्मेंद्र यांनी 2004 मध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीने निवडणूक लढवली होती. यावेळी त्यांच्यावर जोरदार टीका सुद्धा झाली होती.

जया बच्चन – जया बच्चन ह्या जितक्या प्रतिभावान अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध होत्या तितक्याच त्या कुशल राजकारणीसुद्धा आहेत. त्या राजकारणात नेहमी सक्रिय असतात. समाजवादी पक्षाच्या त्या खासदार आहेत. त्यांना उत्कृष्ट संसदपटूचा पुरस्कार सुद्धा मिळाला आहे.

हेही पाहा : एकेकाळच्या हिट सिंगर जोडीने तब्बल ४ वर्षे एकत्र गायले नव्हते गाणे । Lata And Rafi Controversy

अमिताभ बच्चन – हिंदी चित्रपटसृष्टीतील महानायक अमिताभ बच्चन यांनी राजकारणात सुद्धा आपली झलक दाखवली आहे. 1984 मध्ये त्यांनी राजीव गांधी यांच्या प्रचारासाठी राजकारणात प्रवेश केला होता. त्यांनी उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री हेमवती नंदन बहुगुणा यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती यामध्ये त्यांचा विजय झाला होता. मात्र राजकारणात त्यांना रस नसल्याने त्यानंतर त्यांनी राजीनामा दिला.

किरण खेर – प्रसिद्ध अभिनेत्री किरण खेर यांनी अनेक चित्रपटात काम केले आहे. त्यांच्या अभिनयाचे अनेक चाहते आहेत. त्याचसोबत त्यांनी राजकारणातसुद्धा आपला ठसा उमटवला आहे. किरण खेर यांनी स्त्री भ्रूणहत्या आणि कॅन्सरच्या विरोधात केलेल्या सामाजिक कार्याने आपल्या राजकारणाला सुरुवात केली. अण्णा हजारे यांच्यासोबत त्यांनी 2011 मध्ये झालेल्या आंदोलनातही सहभाग घेतला होता. नरेंद्र मोदी यांच्या त्या समर्थक असून त्यांनी त्यांचा प्रचार केला होता. 2014 मध्ये त्या निवडणूकीच्या रिंगणात उतरल्या आणि दणदणीत विजय सुद्धा मिळवला होता.

जया प्रदा – हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री जया प्रदा यांनी अभिनय क्षेत्राला रामराम ठोकत राजकारणात प्रवेश केला होता. त्यांनी 1994 मध्ये तेलुगू देसम पार्टी या पक्षातून आपल्या राजकारणाला सुरुवात केली. मात्र चंद्रा बाबू नायडू यांच्यासोबत झालेल्या मतभेदांमुळे त्यांनी पक्ष सोडला.

राज बब्बर – अभिनेते राज बब्बर 1989 मध्ये जनता दलात सहभागी झाले होते. मात्र त्यांनी लगेच पक्ष बदलत समाजवादी पार्टीत प्रवेश केला. ते दीर्घकाळ राज्यसभा सदस्य होते. 2004 मध्ये त्यांना त्यांच्या पक्षातून निलंबित करण्यात आले.

शत्रुघ्न सिन्हा – हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रसिद्ध खलनायक असलेले शत्रुघ्न सिन्हा राजकारणात मात्र हीरो ठरलेत. त्यांनी अभिनेता आणि त्यांचे मित्र राजेश खन्ना यांच्या विरोधात निवडणूक लढवत आपल्या राजकारणाची सुरुवात केली होती. मात्र ते ही निवडणूक हरले. ते सध्या राजकारणात सक्रिय आहेत.

गोविंदा – 90 च्या दशकातील लोकप्रिय अभिनेता असलेल्या गोविंदाने राष्ट्रीय कॉंग्रेस मधून आपल्या राजकारणाला सुरुवात केली होती. 2004 मध्ये त्यांनी मुंबईमधून आमदारकीची निवडणूक लढवली होती. यामध्ये त्याने भाजपा नेते राम नाईक यांचा पराभव केला होता. मात्र काही काळाने राजकारणातून पुन्हा सिनेसृष्टीत काम करण्यास सुरुवात केले.

उर्मिला मातोंडकर – अभिनेत्री उर्मिला मातोंडकर 2019 पासून लोकसभा निवडणूक लढवली होती. मात्र तिला या निवडणुकीत पराभव स्विकारावा लागला. मात्र लगेच तिने पक्ष बदलत शिवबंधन हाती बांधले होते.राजकारणात गेलेले कलाकार, जया बच्चन, अमिताभ बच्चन, जया प्रदा, actor in politics, govinda, shatrughan sinha,

हेही वाचा :

हे देखील वाचा