धूम्रपान सेहत के लिये हानिकारक है, हे वाक्य तुम्ही एखादा सिनेमा पाहाताना ऐकलं किंवा वाचलं नक्कीच असेल ना. कितीही म्हटलं तरी चित्रपट किंवा ऍक्टर्स हे लोकांसमोर येत असतात, त्यामुळे बऱ्याचदा चित्रपटात दाखवलेल्या गोष्टींचा किंवा ऍक्टर्सच्या कृतींचा सामन्य माणसांच्या आयुष्यावर मोठा परिणाम होत असतो. याच गोष्टींचा विचार करून धूम्रपान सेहत के लिये हानिकारक है हे वाक्य सातत्याने सिनेमा पाहाताना समोर येतच असतं. एखादा व्यक्ती सेलिब्रेटी झाला की तो अनेक लोकांचा आदर्श बनायला सुरूवात होते. मग अनेकदा त्याच्या चूकीच्या सवयींकडेही लोक आकर्षित होतात, यात स्मोकिंग अर्थात धूम्रपान करण्याच्या सवयींचा समावेश आहे. पण तुम्हाला माहित आहे का बॉलिवूडमध्ये असे अनेक ऍक्टर्स आहेत, ज्यांना कधीकाळी स्मोकिंगचे व्यसन होते, पण त्यांनी प्रयत्नपूर्वक आणि आपल्या चांगल्या व दीर्घायुष्यासाठी दूर केले. कोण आहेत ते ऍक्टर्स चला जाणून घेऊ.
या यादीतील पहिलं नाव म्हणजेच बॉलिवूड इंडस्ट्रीमधील चॉकलेट बॉय आणि कपूर खानदान का छोकरा रणबीर कपूर. त्यालाही स्मोकिंगचं व्यसन होतं बरं का, तेही अगदी १५ व्या वर्षीच. पण अनेक रिपोर्टनुसार त्यानेच हा खुलासाही केलेला की हे सर्वात वाईट व्यसन आहे. बरं असंही म्हटलं जातं हा की तो ऑस्ट्रियाला स्मोकिंग सोडण्यासाठी गेलेला, तिथे त्याने अनेकदा प्रयत्न केला. पण अखेर बर्फी चित्रपटाच्या शूटींग दरम्यान दिग्दर्शक अनुराग बासू यांनी त्याला स्मोकिंगपासून रोखलं, ज्यामुळे त्याला हे व्यसन सोडनं सोपं गेलं.
यादीतील दुसरं नाव म्हणजे अमिर खान. मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ज्याला ओळखलं जातं त्या अमिर खानला चक्क दिवसातून ४० सिगारेट ओढण्याची सवय होती पण कुटुंबात कोणालाच त्याची ही सवय आवडत नसल्याने त्याने १ जानेवारी २०११ पासून स्मोकिंग करणे सोडून दिले. पण नंतर त्याला पुन्हा त्या सवयीने ग्रासले होते, जी पुन्हा सोडण्यासाठी तो प्रयत्न करतोय.
डान्स आणि ऍक्टिंग दोन्हीत भारी असणाऱ्या हृतिक रोशन यालाही स्मोकिंगचं व्यसन होत बरं. त्याने हे व्यसन सोडण्यासाठी खूप प्रयत्न केले. त्यासाठी त्याने वेगवेगळ्या गोष्टी ट्राय केल्या, त्याने आर्टिकल्सही वाचले. पण अखेर ऍलेन कार यांचे इजी वे टू स्टॉप स्मोकिंग हे पुस्तक वाचल्यानंतर त्याने स्मोकिंग करणे सोडून दिले. मध्यंतरी चाहत्यांनी त्याला स्मोकिंगबद्दल प्रश्न विचारल्यावर त्याने हे व्यसन सोडले असल्याचे सांगितले. तो असंही म्हणाला होता की, खरोखर तो जर क्रिश असता तर त्याने पृथ्वीवरील सर्व सिगारेट नष्ट केल्या असत्या.
नेहमीच वेगळ्या धाडणीच्या रोलसाठी लक्षात राहणारी अभिनेत्री म्हणजे कोकना सेन. तीला देखील स्मोकिंगचं व्यसन होतं. पण म्हणतात ना आईपण एखाद्या स्त्रीच्या आयुष्यातील अनेक गोष्टी बदलतं तसंच झाला कोकना बरोबरही. तिने प्रेग्नंट असताना स्मोकिंगच्या व्यसनाला टाटा-बायबाय केलं.
या यादीतील पुढचं नाव अजय देवगण. अनेक ऍक्शन फिल्ममुळे हिट झालेला अजय देवगणही एकेकाळी मोठ्याप्रमाणात स्मोकिंग करायचा. पण अनेक रिपोर्ट्सनुसार त्याने रेड चित्रपटाच्या दरम्यान त्याने स्मोकिंगला आपल्यापासून दूर केले. त्याच्या एका मुलाखतीत त्याने असेही सांगितलेले की, तो पूर्वी दिवसाला १०० पण सिगारेट ओढू शकत होता, पण त्याची मुलगी त्याला यावरून बोलत असल्याने अखेर त्याने स्मोकिंगचे हे व्यसन सोडण्याचा निर्णय घेत प्रमाण कमी करायला सुरूवात केली.
सध्या चित्रपटांबरोबर आपल्या मुलांमुळेही सातत्याने चर्चेत येणारा अभिनेता म्हणजे सैफ अली खान. त्याला तर स्मोकिंगमुळे एकदा हार्ट ऍटॅकही येऊन गेलाय. आता एकदा असं झालंय म्हणल्यावर पुन्हा जोखीम घेण्यास काहीच अर्थ नसतो, त्यामुळे त्यानेही आरोग्य चांगले राहण्यासाठी स्मोकिंगला गुडबाय करून टाकलं.
भाईजान सलमान खान देखील या यादीत आहे बरं का मित्रांनो. तो तर चेन स्मोकर होता. पण त्याला फेसियल नर्व डिसॉर्डरने ग्रासल्याने त्यानेही स्मोकिंगला नाही म्हणण्याचे ठरवले आणि आपल्या आयुष्यातून स्मोकिंग काढून टाकले.
स्मोकिंग सोडलेल्या ऍक्टर्सच्या यादीत अर्जून रामपालही आहे, त्यानेही स्मोकिंगची सवय सोडली होती, याबद्दल त्याने ट्वीटरवर माहितीही दिलेली.
मित्रांनो व्हिडिओच्या शेवटी इतकंच की केवळ बॉलिवूड ऍक्टर्सच नाही, तर स्मोकिंग डेंजरस आहे हे जगातील अनेक सेलिब्रेटींनीही सांगितलं आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनीही स्मोकिंगची सवय सोडली होती, यासाठी त्यांना त्यांची पत्नी मिशेल ओबामा यांनीच प्रोत्साहन दिलेले. याशिवाय अनेकांची आवडती अभिनेत्री आणि फ्रेंड्स या मालिकेमुळे गाजलेली जेनिफर ऍनिस्टन ही देखील एकेकाळी चेन स्मोकर होती. पण नंतर तिने आरोग्याकडे लक्ष देत स्मोकिंगला बाय केले.
इथे पाहा संपूर्ण व्हिडिओ: बॉलिवूडच्या ‘या’ कलाकारांना दिवसाला १०० सिगारेट पडायच्या कमी । Bollywood Actors Smoking Addiction