Wednesday, July 3, 2024

रिलवरून ट्रोल करू पाहणाऱ्या नेटकाऱ्याला ऐश्वर्या नारकर यांचे सणसणीत उत्तर, कमेंट करत म्हणाल्या, “कोणी विचारलाय सल्ला?…”

मराठी मनोरंजनविश्वातील अतिशय लोकप्रिय आणि प्रसिद्ध जोडी म्हणजे ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर. मागील अनेक वर्षांपासून मनोरंजनविश्वात सक्रिय असणाऱ्या या जोडीचे लाखो फॅन्स आहेत. ऐश्वर्या आणि अविनाश यांची जोडी कमालीची चर्चेत असते. दोघेही आपापल्या कामात व्यस्त असले तरी एकमेकांना वेळ देतात. ऐश्वर्या आणि अविनाश दोघेही आपल्या अभिनयातून प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसून येतात. त्यांच्या अभिनयाचे लाखो चाहते आहेत.

मात्र आता अविनाश आणि ऐश्वर्या यांचे सोशल मीडिया रिल्स देखील त्यांना कमालीचे प्रकाशझोतात आणत आहे. प्रत्येक ट्रेंडिंग गाण्यावरील या दोघांचे डान्सिंग रिल्स खूपच व्हायरल होऊन गाजत आहे. यामुळे त्यांना कमालीचे लाइमलाइट देखील मिळत आहे. प्रत्येक रिल्स गाजत असताना आणि व्हायरल होताना एका वेगळ्याच गोष्टीमुळे तर चर्चेत आले आहे. एकीकडे अविनाश यांनी तमन्ना भाटियाच्या ट्रेंडिंग ‘कावाला’ गाण्यावर रील केले जे चांगलेच व्हायरल झाले होते. त्यानंतर अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी एका कोळी गाण्यावरील रील पोस्ट केले. यावरच एका नेटकाऱ्याने एक कमेंट केली जी कमालीची व्हायरल झाली. मात्र या कमेंटला ऐश्वर्या यांनी दिलेले उत्तर चांगलेच गाजत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Aishwarya Narkar (@aishwarya.narkar)

एका नेटकाऱ्याने ऐश्वर्या यांच्या रिलवर कमेंट करताना लिहिले, “छान संस्कृती आहे मॅडम. नवरा दुसऱ्या मुलींसोबत नाचतो आणि तुम्ही दुसऱ्या मुलांसोबत नाचता; विदेशी संस्कृतीचं अंधानुकरण म्हणतात याला.” या कमेंटवर ऐश्वर्या यांनीही सणसणीत उत्तर देत लिहिले, ”तुमच्या बुध्यांकाचं काय बरं करावं?” यावर त्या नेटकऱ्याने पुन्हा लिहिले, ”माझ्या बुध्यांकाची काळजी करण्यापेक्षा थोडं भारतीय संस्कृतीप्रमाणे वागा.” त्यावर ऐश्वर्या म्हणाल्या की, ”ते आधी तुम्ही जाणून घ्या…”

यावर एका दुसऱ्या नेटकऱ्याने कमेंट करत लिहिले, ”तुम्हाला बघायला आवडतंय ना विदेशीच… नाहीतर तुम्ही इथे नसता.” यावर नेटकऱ्याने पुन्हा लिहिले, ”मी फक्त सल्ला दिला आहे, त्यात तुम्ही कशाला तोंड घालता.” त्यावर ऐश्वर्या यांनी सरळ लिहिले, ”विचारलाय कोणी सल्ला? कळण्यापलीकडचे आहे.. जाऊदे…” सध्या ऐश्वर्या यांचे हे रील आणि त्यांचे हे उत्तर खूपच गाजत असून त्यांचे फॅन्स त्यांना पाठिंबा देताना दिसत आहे.

दरम्यान ऐश्वर्या यांच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास त्या सध्या ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत नकारात्मक भूमिकेत दिसत आहेत.

हे देखील वाचा