Monday, August 4, 2025
Home बॉलीवूड ऐश्वर्या अन् अभिषेकच्या लग्नातील ‘त्या’ फोटोमागे दडलंय वेगळंच सत्य; स्वत: अभिनेत्याने केला खुलासा

ऐश्वर्या अन् अभिषेकच्या लग्नातील ‘त्या’ फोटोमागे दडलंय वेगळंच सत्य; स्वत: अभिनेत्याने केला खुलासा

कलाविश्वातील जोडप्यांमध्ये ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन ही सर्वात लोकप्रिय जोडी आहे. या दोघांनी चाहत्यांच्या मनावर खूप राज्य केले आहे. अभिनेत्री तिचे लग्न झाल्यापासून सोशल मीडियावर तशी फार सक्रिय नसते. परंतु तिचे चाहते तिच्या कुटुंबियांच्या इंस्टाग्राम आणि अन्य सोशल मीडिया अकाउंटवरून तिला शोधण्याचा प्रयत्न करत असतात. अशात सध्या या दोघांचा लग्नातील एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

साल २००७ मध्ये ऐश्वर्या आणि अभिषेकचे लग्न झाले. यावेळी या दोघांच्या लग्नाचे अनेक फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले होते. या दोघांच्या फोटोंना चाहत्यांनी खूप पसंती दिली होती. या दोघांचे लग्न हिंदू रीतीप्रमाणे पार पडले. यावेळी दोघेही खूप खुश होते. तसेच या दोघांच्या लग्नावर त्यांच्या चाहत्यांनी त्यांना भरपूर शुभेच्छा दिल्या होत्या. (Actress Aishwarya Rai and actor Abhishek bachchan wedding fake photo viral on social media actor itself proved it wrong)

सध्या सोशल मीडियावर त्यांच्या लग्नातील व्हायरल होत असलेला फोटो बराच ब्लर आहे. यामध्ये दोघेही खूप खुश दिसत आहेत. तसेच त्यांनी यामध्ये सफेद आणि लाल रंगाचे कपडे परिधान केलेले आहेत. त्यांच्या लग्नातील हा फोटो असावा, असे सर्व चाहत्यांना वाटत आहे. परंतु या फोटोमागे एक वेगळेच सत्य दडलेले आहे. त्यांच्या चाहत्यांचा निवळ गैरसमज झाला आहे की, हा त्यांच्या लग्नातील फोटो आहे. अभिषेकने स्वतः एक ट्वीट करत या फोटोमागील सत्याचा उलगडा केला आहे.

काय आहे फोटोमागील सत्य?
हा फोटो अभिषेक आणि ऐश्वर्याच्या लग्नातील नाही. अभिषेकने ट्वीट करत लिहिले आहे की, “हा आमच्या लग्नातील फोटो नाही. कोणीतरी हा फोटो एडिट करून बनवला आहे. दुसऱ्या कोणाच्यातरी चेहऱ्यावर आमचा चेहरा लावण्यात आला आहे.” त्याच्या ट्वीटमुळे या फोटोमागील सत्य सगळ्यांसमोर आले. हा फोटो जरी खोटा असला, तरी त्या दोघांच्या लग्नातील आठवणी चाहत्यांच्या मनात पुन्हा एकदा जाग्या झाल्या आहेत.

या चित्रपटांमध्ये ऐश -अभीने केलंय एकत्र काम
ऐश्वर्या आणि अभिषेकने अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. यातील काही चित्रपट चांगले चालले, तर काही फ्लॉप झाले. त्यांनी ‘ढाई अक्षर प्रेम के’, ‘कुछ ना कहो’, ‘उमराव जान’, ‘धूम-२’, आणि ‘गुरु’ अशा चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. ‘बंटी और बबली’ या चित्रपटामध्ये ऐश्वर्याने फक्त एक आयटम सॉंग केले होते. तसेच या दोघांचा साल २००७मध्ये आलेल्या ‘गुरु’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली होती. परंतु त्यांचे बाकीचे चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर फारसे राज्य करू शकले नाही.

सध्या अभिनेत्री तिच्या आयुष्यामध्ये खूप खुश असून रुपेरी पडद्यापासून दूर आहे. तसेच अभिषेक अलिकडेच ‘द बिग बुल’ या चित्रपटामध्ये झळकला होता. ‘बॉस विश्वास’ आणि ‘दसवीं’ हे त्याचे आगामी चित्रपट आहेत.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘कू’ ऍपवरही कंगना रणौत गाजवतेय वर्चस्व; काही दिवसांतच मिळवले तब्बल ‘इतके’ फॉलोव्हर्स

-‘हा निव्वळ पब्लिसिटी स्टंट’, म्हणत मनोज पाटील आत्महत्या प्रकरणावर साहिल खानने सोडले मौन

-शूटिंग सोडून तुर्कीमध्ये ‘हे’ काम करताना दिसली बॉलिवूडची ‘बार्बी गर्ल’, व्हिडिओ शेअर करत म्हणतेय…

हे देखील वाचा