Monday, June 9, 2025
Home बॉलीवूड अभिषेकसाठी पत्नी ऐश्वर्या बनली फोटोग्राफर, अभिनेत्याने फोटो शेअर करत लिहिले खास कॅप्शन

अभिषेकसाठी पत्नी ऐश्वर्या बनली फोटोग्राफर, अभिनेत्याने फोटो शेअर करत लिहिले खास कॅप्शन

बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन पत्नी ऐश्वर्या राय बच्चन आणि मुलगी आराध्या बच्चनसोबत दुबईत सुट्टीचा आनंद घेत आहे. अभिषेकने अलीकडेच त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर त्याच्या दुबई ट्रिपचे फोटो शेअर केले आहेत. यासह, त्याने कॅप्शनमध्ये त्याच्या पर्सनल फोटोग्राफरचे नाव देखील सांगितले आहे. नेहमी प्रमाणेच अभिषेकने शेअर केलेला हा फोटो देखील सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

इंस्टाग्राम अकाऊंटवर आपला एक सुंदर फोटो शेअर करताना अभिषेकने सांगितले की, हे फोटो इतर कोणीही नाही, तर त्याची पत्नी ऐश्वर्याने क्लिक केले आहेत. त्याने त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, “सूर्य, वाळू आणि समुद्र! #Dubai @aishwaryaaraibachchan_arb.” अभिषेकच्या या फोटोवर चाहते भरभरून प्रेमाचा वर्षाव करत आहेत आणि आतापर्यंत या फोटोंना ९० हजारांपेक्षाही अधिक लाईक्स देखील मिळाल्या आहेत.

यापूर्वी अभिषेक ऐश्वर्यासोबत पॅरिसमध्ये होता. त्याने तेथून रात्री झगमगत्या आयफेल टॉवरची एक छोटी बूमरॅंग क्लिप पोस्ट केली होती. परदेश प्रवास करण्यापूर्वी ऐश्वर्याने सांगितले की, ती दोन वर्षांनी परदेशात ट्रिपला जात आहे आणि त्याबद्दल ती खूप उत्साहित होती.

ऐश्वर्याकडे ‘हे’ आहेत प्रोजेक्ट
वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं, तर ऐश्वर्या पुढे मणिरत्नम दिग्दर्शित ‘पोन्नीयन सेल्वन’मध्ये दिसणार आहे. अभिनेता आणि राजकारणी आर सरथकुमार देखील तिच्यासोबत चित्रपटात दिसणार आहेत. कल्की कृष्णमूर्ती यांच्या लोकप्रिय ऐतिहासिक कादंबरीवर आधारित हा चित्रपट एक पीरियड ड्रामा आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, ती लवकरच अनुराग कश्यप दिग्दर्शित ‘गुलाब जामुन’मध्ये दिसू शकते, ज्यात अभिषेक बच्चन देखील असेल. ती शेवटची ‘फन्ने खान’ मध्ये दिसली होती.

‘या’ चित्रपटांमध्ये दिसणार अभिषेक
दुसरीकडे, ‘द बिग बुल’ फेम अभिषेक पुढे ‘बॉब बिस्वास’मध्ये दिसणार आहे. जो विद्या बालनचा हिट चित्रपट ‘कहानी’मध्ये लोकप्रिय झालेल्या उसी नावाच्या काल्पनिक पात्रावर आधारित आहे. यासोबतच त्याच्याकडे ‘दसवीं’ हा देखील चित्रपट आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘मी माझ्या हृदयाच्या जवळ ठेवते’, म्हणत सिद्धार्थ मल्होत्रासोबतच्या नात्याबद्दल बोलली कियारा\

-जॅकलिन फर्नांडिसचे ब्लॅक ब्रालेट, शिमरी जॅकेटमधील बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर व्हायरल

-आसामच्या फ्लोरिना गोगोईने पटकावले ‘सुपर डान्सर चॅप्टर ४’चे विजेतेपद

हे देखील वाचा