बॉलिवूडमध्ये रोमँटिक जोड्यांची रांगच लागलेली आहे. त्या रोमँटिक जोड्यांमध्ये बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांचाही समावेश होतो. या दोघांनी 2007मध्ये लग्नगाठ बांधली होती. आजही त्यांच्या लग्नानंतरचे अनेक व्हिडिओ समोर येत असतात. अशात ऐश्वर्या आणि अभिषेकचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओत ऐश्वर्या पती अभिषेकसोबत फ्लर्ट करताना दिसत आहे. त्यानंतर अभिषेक ऐश्वर्याच्या सुंदरतेबाबत असे काहीतरी बोलतो, ज्यामुळे सर्वत्र टाळ्यांचा कडकडाट होतो.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) म्हणते की, “मी त्यांच्यासोबत जास्त चांगली दिसते. त्यामुळे तुम्हाला धन्यवाद.” हे ऐकताच अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) याच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळतो. जेव्हा होस्ट त्याला विचारतो की, “तयार होण्यासाठी सर्वात जास्त वेळ कोण घेतं?” यानंतर ऐश्वर्या माईक अभिषेककडे देते. त्यानंतर अभिषेक प्रेमळ उत्तर देत म्हणतो की, “मला अशाप्रकारे तयार होण्यासाठी एका गावाला यावे लागते आणि ती फक्त अशीच्या अशीच उठते.”
View this post on Instagram
विशेष म्हणजे, ऐश्वर्या आणि अभिषेकच्या लग्नाला आता 16 वर्षे झाली आहेत. रंजक बाब अशी की, ऐश्वर्या ही अभिषेकपेक्षा 3 वर्षांनी मोठी आहे. मात्र, वयातील अंतराचा त्यांना काहीच फरक पडत नाही. कारण, आजही त्यांच्या नात्यात खूप प्रेम आहे. जेव्हाही अभिषेक आणि ऐश्वर्या यांना वेळ मिळतो, तेव्हा ते एकत्र वेळ घालवण्यासाठी सुट्ट्यांवर जातात. त्यांना एक मुलगीदेखील आहे. तिचे नाव आराध्या बच्चन (Aaradhya Bachchan) आहे.
ऐश्वर्याच्या कामाविषयी बोलायचं झालं, तर ती शेवटची 2022मध्ये रिलीज झालेल्या ‘पोन्नियिन सेल्वन’ सिनेमाच्या पहिल्या भागात दिसली होती. आता ती 2023मध्ये याच सिनेमाच्या दुसऱ्या भागात दिसणार आहे. याव्यतिरिक्त अभिषेकच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर तो शेवटचा 2022च्या ‘दसवीं’ सिनेमात झळकला होता. त्याच्या खात्यात ‘हाऊसफुल 5’ हा सिनेमादेखील आहे. (actress aishwarya rai flirting in event husband abhishek bachchan gives this reaction aishwarya abhishek see video)
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
बोंबला! महेश बाबूचा भाऊ चौथ्यांदा अडकणार लग्नाच्या बेडीत? किसींग व्हिडिओवर भडकली तिसरी पत्नी
अपघातानंतर अवघ्या 12 तासातच रोहित शेट्टी परतला सेटवर, सिद्धार्थने कौतुक करत शेअर व्हिडिओ केला