Saturday, December 21, 2024
[aioseo_breadcrumbs]

फॅशन वीकमध्ये जलवे दाखवल्यावर पॅरिसच्या रस्त्यांवर अभिषेक, आराध्यासोबत फिरताना दिसली ऐश्वर्या राय

बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या राय आपल्या सौंदर्यासाठी आणि फॅशनसाठी ओळखली जाते. ती अनेकदा आपले आपले फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांबरोबर शेअर करत असते. त्यामुळेच ती सतत चर्चेचा विषय ठरते. तिने केवळ आपल्या अभिनयाने नाही, तर आपल्या सौंदर्यानेही चाहत्यांच्या मनावर भुरळ पाडली आहे. ऐश्वर्याने १९९४ मध्ये जागतिक सौंदर्य स्पर्धेत विजेतेपद पटकावले. त्यानंतर तिने बॉलिवूडच्या विश्वात पाऊल ठेवले. नुकतीच ती पॅरिस फॅशन वीकमध्ये रॅम्प वॉक करताना दिसली. त्यासाठी तिचे केवळ चाहत्यांकडूनच नाही, तर कलारांकडूनही भरभरून कौतुक केले जात आहे. यासोबतच तिचे या फॅशन वीकमधील पांढऱ्या रंगाच्या गाऊनमधील फोटो देखील चाहत्यांना प्रचंड आवडले आहेत.

अलीकडेच तिचे काही फोटो समोर आले आहेत. ज्यात ऐश्वर्यासह अभिषेक बच्चन आणि मुलगी आराध्या बच्चन देखील पॅरिसमध्ये स्पॉट झाले आहेत. यासह लॉरियल इव्हेंटचे फोटोही समोर आले आहेत, जिथे ऐश्वर्या स्टेजवर उभी असून, ऐश्वर्या काळ्या रंगाच्या सूटमध्ये कमालीची सुंदर दिसत आहे. तिचे हे फोटो लाखो चाहत्यांची मने जिंकत आहेत.

अलीकडेच तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ज्यामध्ये ऐश्वर्या राय रॅम्प वॉक करताना दिसली. यात ऐश्वर्याने निळ्या रंगाचा डिझायनर ड्रेस आणि त्यावर बेल बॉटम जीन्स घातली होती. तिचे मोकळे केस या ड्रेसवर तिला अधिक उठावदार बनवत होते. तिचा लुक पाहून चाहत्यांनी जोरदार टाळ्या वाजवत तिला प्रोत्साहन दिले होते. तर या व्हिडिओमध्ये ती तिच्या चाहत्यांना फ्लाइंग किस देताना दिसली होती.

ऐश्वर्या रायच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर ती आजकाल तिच्या तामिळ चित्रपटासाठी खूप चर्चेत आली आहे. सोबतच ती अनुराग कश्यपच्या ‘गुलाब जामुन’ या चित्रपटातही दिसणार आहे. ती शेवटची ‘फन्ने खान’ सिनेमात दिसली होती. आता ती मणिरत्नम यांच्या ‘पोन्नीयन सेलवान’मध्ये दिसणार आहे. यामध्ये अभिनेता आणि राजकारणी आर सारथकुमार देखील तिच्यासोबत चित्रपटात दिसणार आहे. कल्की कृष्णमूर्ती यांच्या लोकप्रिय ऐतिहासिक कादंबरीवर आधारित हा चित्रपट आधारित असून, हा सिनेमा एक पीरियड ड्रामा आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-रितेश अन् जिनिलिया लावणार ‘केबीसी १३’मध्ये हजेरी; ‘बिग बीं’कडून समजणार पत्नीच्या शार्प मेमरीचे नुकसान

-अंमली पदार्थ प्रकरणी अडकलेल्या आर्यन खानला गुरुवारी मिळणार जामीन? जाणून घ्या काय सांगतात प्रसिद्ध वकील

-बिग बॉसपेक्षा जास्त पैसे मी बाहेर राहून कमावू शकते, म्हणत ‘या’ भोजपुरी अभिनेत्रीने धुडकावली ऑफर

हे देखील वाचा