Saturday, December 21, 2024
[aioseo_breadcrumbs]

ऐश्वर्याची लाडकी लेक आराध्याने गायले सियारामचे भजन, नेटकरी म्हणाले, ‘असे संस्कार…’

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय तिच्या अभिनयाव्यतिरिक्त तिच्या सौंदर्यासाठीही ओळखली जाते. ऐश्वर्याची आणि अभिनेता अभिषेक बच्चन यांची ९ वर्षांची मुलगी आराध्या देखील सतत चर्चेत असते. चाहते नेहमीच सोशल मीडियावर शेअर केलेल्या आराध्याच्या व्हिडिओला पसंती देत असतात. नुकताच नवरात्रीच्या शुभ प्रसंगी आराध्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ती सियारामचे भजन गाताना दिसत आहे. अर्थात आराध्याचा हा व्हिडिओ जुना आहे, पण ऐकायला खूप सुंदर आहे. त्यासह नवरात्रीच्या निमित्ताने अगदी योग्य आहे. आराध्याच्या फॅन क्लबने हा व्हिडिओ शेअर केला आहे. चाहत्यांना या व्हिडिओमधील आराध्याचा क्यूट अंदाज आवडला आहे.

व्हिडिओमध्ये पाहिले जाऊ शकते की, आराध्या बच्चन गुलाबी रंगाची फ्रॉक परिधान करून दोन्ही हात जोडून सियारामचे भजन गात आहे. आराध्याला अशाप्रकारे देवाची भक्ती करताना पाहून तिचे चाहतेही खूप खुश आहेत आणि तिच्या संस्काराचे कौतुक करत आहेत. विशेष म्हणजे बच्चन कुटुंब कोणताही सण मोठ्या थाटामाटात साजरा करतात. बच्चन कुटुंबाचा देवावर खूप विश्वास आहे. अशा स्थितीत आराध्याला दिलेले संस्कार पाहून चाहते स्वतःला आनंद व्यक्त करण्यापासून रोखू शकत नाहीत. एका चाहत्याने म्हटले की, “असे संस्कार देण्यासाठी खूप खूप धन्यवाद.”

अलीकडेच आराध्या बच्चन अभिषेक आणि ऐश्वर्या सोबत विमानतळावर स्पॉट झाली होती. त्यानंतर ती खूप प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. या व्हिडिओमध्ये आराध्या तिच्या उंचीबद्दल बरीच चर्चेचा विषय ठरली होती. वयाच्या अवघ्या ९ व्या वर्षी आराध्या तिच्या आईच्या खांद्याला लागत आहे, अशा स्थितीत चाहते आराध्या उंचीबाबत तिच्या वडिलांवर आणि आजोबांवर जाईल, असे म्हणत होते.

आराध्यामुळे ऐश्वर्या झाली होती ट्रोल
आराध्या नुकतीच आई ऐश्वर्या रायसोबत पॅरिस फॅशन वीकसाठी गेली होती. या दरम्यान ती विमानतळावर दिसली होती. मात्र, विमानतळावर परतताना त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर ऐश्वर्याला खूप ट्रोल करण्यात आले.

अगदी ऐश्वर्याला ‘ओव्हरप्रोटेक्टिव्ह आई’ असेही म्हटले गेले होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-रस्त्यावर गाणी गाणाऱ्या भिकाऱ्याला ओळखलंत का? आहे बॉलिवूडमधील दिग्गज गायक

-आपल्या चिमुकल्यांसह शाहिद अन् मीरा विमानतळावर झाले स्पॉट; तुम्हीही पाहा ‘हा’ सुंदर व्हिडिओ

-प्रतिक्षा संपली! ‘भाईजान’ने जाहीर केली ‘अंतिम’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख, टिझर पाहूनच चाहते खुश

हे देखील वाचा