Tuesday, July 9, 2024

भारीच ना! अक्षरा सिंगचे ‘दिल की पुकार’ गाणे चाहत्यांच्या भेटीला; एकाच दिवसात मिळाले लाखो हिट्स

भोजपुरी अभिनेत्री अक्षरा सिंग सध्या चांगलीच चर्चेत आहे. आपल्या अभिनयाने तिने आतापर्यंत लाखो चाहत्यांची मने जिंकली आहेत. उत्तम अभिनेत्रीसह ती एक उत्तम गायिका देखील आहे. आजवर तिने इंडस्ट्रीमध्ये अनेक गाणी गायली आहेत. तिच्या आवाजाच्या जादूने ती सध्या लाखो चाहत्यांच्या हृदयावर राज्य करत आहे. अशात नुकतेच तिचे आणखीन एक नवीन गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.

‘दिल की पुकार’ या तिच्या नवीन गाण्याला प्रेक्षकांनी चांगलेच डोक्यावर घेतले आहे. सध्या नवरात्र उत्सव सुरू आहे. अशात देवीविषयी मनामध्ये असलेली आस्था या गण्यामधून सांगण्यात आली आहे. या गाण्याचा व्हिडिओ अक्षराने तिच्या यूट्यूब चॅनलवर प्रदर्शित केला आहे. तिच्या या गाण्याला आतापर्यंत ३ लाखांपेक्षाही अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

या व्हिडिओमध्ये देवीची आकर्षक मूर्ती दिसत आहे. तसेच अक्षरा रडत देवीसाठी स्वतःच्या मनातील भावना सांगत गाणे गात आहे. या गाण्याचे बोल मनोज मतलबीने लिहिले आहेत. तसेच म्युझिक अविनाशचे आहे. लकीने यासाठी कोरिओग्राफी केली आहे. अक्षराच्या या गाण्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे.

अक्षराचे हे पहिले गाणे नाही जे एवढे व्हायरल होत आहे. तिने याआधी देखील एक भक्ती गीत गायले होते. ‘मां मेरी आ जाएगी’ या गाण्याला देखील प्रेक्षकांची खूप पसंती मिळाली. तसेच आजवर तिने अनेक वेगवेगळी गाणी गायली आहेत.

अक्षराबद्दल बोलायचे झाल्यास, नुकतीच ती ‘बिग बॉस ओटीटी’ मध्ये झळकली होती. बिग बॉसच्या घरामध्ये देखील तिला खूप पसंती मिळाली. तिने आतापर्यंत ‘सत्यमेव जयते’, ‘डिलर’, ‘साथिया’, ‘सत्या’, ‘धडकन’, ‘सरकार राज’ अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.

साल २०१५ मध्ये तिने मालिकांमध्ये पदार्पण केले. तिची पहिली मालिका होती ‘काला टीका’ यामध्ये तिने दमदार अभिनय केला आहे. ‘सर्विस वाली बहू’ या मालिकेमध्ये देखील ती झळकली होती.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-Video: दुर्गा पूजेदरम्यान काजोल भावुक; काकांना मिठी मारत लागली रडू

-मायशा- ईशानच्या नात्याबद्दल उमरने केली ‘अशी’ कमेंट, सोशल मीडियावर चाहते बांधतायेत कौतुकाचे पूल

-कर्जात बुडालेल्या अमिताभ बच्चन यांचे तारणहार ठरले ‘यश चोप्रा’ आणि ‘केबीसी’

हे देखील वाचा