Wednesday, June 26, 2024

अक्षरा अन् पवन सिंगवर भोजपुरीच्या प्रसिद्ध गायकाचे अश्लील गाणे; अभिनेत्रीनेही दिले सडेतोड प्रत्युत्तर

भोजपुरी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री अक्षरा सिंग ही या दिवसात खूप चर्चेत आहे. अक्षरा सिंगवर बनवलेले एक अश्लील गाणे या दिवसात वेगाने व्हायरल होत आहे. हे गाणे भोजपुरी संगीत क्षेत्रातील प्रसिद्ध गायक नीलकमल सिंग याने गायले आहे. या गाण्यात अक्षरा सिंगचे नाव पवन सिंगसोबत जोडून काही अपशब्द वापरले आहेत.

हे गाणे प्रदर्शित झाल्यानंतर अक्षरा सिंग स्वतः पुढे आली आणि तिने नीलकमलला चांगलेच उत्तर दिले आहे. तिने फेसबुकवर या गाण्याची यूट्यूब वरील लिंक शेअर करून चांगलेच उत्तर दिले आहे. त्याच्यावर असा आरोप आहे की, त्याने हे गाणे पवन सिंगला खुश करण्यासाठी गायले आहे. या गाण्याचा ऑडिओ शेअर करून तीने नीलकमलला सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे.

https://www.facebook.com/100044238859066/posts/337016031116356/?substory_index=0

अक्षर सिंगने तिच्या या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “नीलकमल तुझे खूप खूप धन्यवाद की, तू या अशा शब्दांचा वापर केला आहे. आई, बहीण, मुलगी आणि एका नारीचा तू एवढा सन्मान केला, त्याबद्दल खूप धन्यवाद. समस्त भोजपुरी इंडस्ट्रीचा तू मान सन्मान वाढवला आहे. त्या बाबत तर मला तुझ्या पायावर पुष्प अर्पण करावेसे वाटत आहे. देव करो! तू ही असली गाणी गाऊन जी काही सफलता मिळवली आहे त्यात आणखी भर पडो.”

यानंतर ती म्हणते की, “एक सांगते की, तू ज्या शब्दांचा वापर केला आहे. ते काली मातेच्या सुप्रीम शक्तीची ताकद आहे. मनापासून आभार.”

भोजपुरी चित्रपटसृष्टीत अक्षरा सिंग आणि पवन सिंग यांची जोडी पडद्यावर खूप लोकप्रिय आहे. पवन आणि आणि अक्षराने अनेक सुपरहिट चित्रपटात काम केले आहे. परंतु एका वेळेनंतर त्यांच्यात काही वाद झाले आणि त्यांच्या नात्यात कटूता आली. त्यांनतर ते दोघे कधीच एकत्र दिसले नाही.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा