Saturday, June 29, 2024

अक्षरा सिंगच्या ‘पगली बुलावे’ गाण्याची यूट्यूबवर जोरदार एंट्री! पुन्हा लावले चाहत्यांना वेड

भोजपुरी होळी गाणे आजकाल प्रेक्षकांमध्ये खूप चर्चेत आहे. होळीचे एकामागून एक गाणे येतच आहेत, जे यूट्यूबवर येताच व्हायरल होऊ लागतात. या गाण्यांनी भोजपुरी संगीताच्या रसिकांनाही अक्षरशः वेड लावले आहे. दरवर्षी होळीमध्ये भोजपुरी इंडस्ट्रीचा बोलबाला असतो. आता चर्चा चालू आहे ती म्हणजे अक्षरा सिंगच्या नव्या गाण्याची. ‘पगली बुलावे’ असे तिच्या नवीन गाण्याचे बोल आहेत. हे गाणे ही नेहमीप्रमाणे रिलीज होताच यूट्यूबवर व्हायरल होत आहे.

या भोजपुरी होळीगीताने रिलीज होताच यूट्यूबवर 8 लाख व्ह्यूजचा टप्पा ओलांडले आणि हजारो प्रतिक्रियाही मिळवल्या आहेत. या गाण्यात अक्षरा सिंगसोबत विशाल सिंग देखील आहे. गाण्याला अविनाश झा घुंगरू यांनी संगीत दिले असून गाण्याचे बोल अजय बच्चन यांनी लिहिले आहे. अक्षरा सिंगचे हे भोजपुरी गाणे सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

गाण्याच्या व्हिडिओमध्ये दाखवले आहे की, अक्षराला होळीच्या प्रसंगी गर्दीतही एकटेपणा जाणवत असतो आणि ती तिच्या प्रियकरासोबत घालवलेले जुने दिवस आठवत असते. यामुळे ती रडू लागते.

गाण्यातील तिचा भावुक अभिनय पाहून चाहते तिचे कौतुक करत आहेत. एक युजर तर शायरी लिहून त्याचे प्रेम व्यक्त करीत आहे. त्याचवेळी, एका संगीत कंपनीने अक्षरासाठी लिहिले की, “लोक कौतुक करो किंवा न करो, तुम्ही चांगले काम करत राहा.” या व्यतिरिक्त कोणी तिच्या सुंदर डोळ्यांचे कौतुक करत आहे, तर कोणी तिच्या अभिनयाचा चाहता आहे.

अक्षराचा यापूर्वीही एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता, ज्याला २० कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘लाज वाटू दे ताई’, निया शर्माच्या बोल्ड डान्स व्हिडिओवर युजर्सची प्रतिक्रिया

-श्श्श्श! स्वप्निल जोशी अभिनित ‘बळी’ चित्रपटाचा टिझर रिलीझ, पाहून तुम्हालाही फुटेल घाम

-गदरमध्ये ज्याने सनी-अमिषाच्या मुलाची भूमिका केली आता तोच होणार गदर दोनचा हिरो, पाहा कोण आहे ‘तो’

हे देखील वाचा