बॉलिवूडमध्ये ज्याप्रमाणे प्रेमाच्या चर्चा होत असतात, त्याचप्रमाणे भोजपुरी इंडस्ट्रीमध्ये देखील मोठ्या प्रमाणात या चर्चा होत असतात. तसेच प्रेम ही अशी गोष्ट आहे की, एखाद्याला प्रेमाच्या बदल्यात प्रेम नाही मिळाले, तर हृदय सहजपणे तुटते. मग ती सामान्य व्यक्ती असो किंवा सेलिब्रिटी. मनोरंजन विश्वात देखील असे अनेक कलाकार आहेत, ज्यांना त्यांचे प्रेम न मिळाल्यामुळे डिप्रेशनचा सामना करावा लागला आहे. मात्र, या कलाकारांनी यातून स्वतःला सावरत आपले करिअर पुढे नेले आहे. या यादीत भोजपुरी अभिनेत्री अक्षरा सिंगचा देखील समावेश आहे.
ब्रेकअपनंतर तुटली होती अक्षरा सिंग
अक्षराने भोजपुरी सिनेसृष्टीत खूप नाव कमावले आहे. तिची फॅन फॉलोविंग खूप जास्त आहे. याच कारणामुळे तिला ‘बिग बॉस ओटीटी’मध्ये सहभागी होण्याची संधीही मिळाली. यादरम्यान अक्षराने तिच्या वैयक्तिक आयुष्याविषयी खुलासा केला. ब्रेकअपनंतर ती डिप्रेशनमध्ये कशी गेली आणि वडिलांच्या सल्ल्याने कशी वाटेवर आली, हे अक्षराने सांगितले होते.
अक्षराचे नाव अभिनेता पवन सिंगसोबत जोडले गेले होते. मात्र, नंतर दोघांचे ब्रेकअप झाले. अक्षराने पवनवर मारहाण करून तिचे करिअर खराब केल्याचा आरोप केला होता. एका मुलाखतीदरम्यान अक्षराने सांगितले होते की, जेव्हा ती या सर्व गोष्टींनी तुटली होती, तेव्हा तिच्या वडिलांचे शब्द तिच्यासाठी उपयुक्त ठरले.
एका मुलाखतीत अक्षरा सिंग म्हणाली की, “जेव्हा मी नैराश्येच्या काळातून जात होते, तेव्हा असे वाटत होते की, परत येण्याचे सर्व मार्ग बंद झाले आहेत. मला मरण्याशिवाय पर्याय नाही. त्यावेळी माझ्या वडिलांनी मला बोलावून विचारले की, तुला कशाची भीती वाटते आणि तुला काय करायचे आहे?”
अक्षराने तिच्या वडिलांना सांगितले की, तिला काहीही करायचे नाही, तेव्हा तिचे वडील म्हणाले, “तुझा वडील म्हणून मी तुला सांगतो की, एकतर तू जा, फाशी घे आणि मर. आता आत्महत्या कर किंवा पुन्हा लढ. तुला जे करायचे आहे ते करण्याचे तुझ्याकडे दोन मार्ग आहेत. माझ्या मुलीला मरायचे होते, ती मेली, याचे वडील म्हणून मला समाधान मिळेल.”
अक्षरा म्हणाली की, “ही गोष्ट मला चापट मारल्यासारखी वाटली. त्याच दिवशी मला वाटले की, आता मागे वळून बघणार नाही.”
अक्षरा सिंग भोजपुरी इंडस्ट्रीतील सर्वात हुशार डान्सर मानली जाते. पवन सिंग आणि खेसारी लाल यादव या दोन्ही अभिनेत्यांसोबत तिच्या जोडीला चांगली पसंती मिळते. अक्षरा एका चित्रपटासाठी १५ ते २० लाख रुपये घेते.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-जाळ अन् धूर संगटच! मोनालिसाने क्रॉप टॉप ड्रेसमध्ये वाढवला सोशल मीडियाचा पारा, फोटो जोरदार व्हायरल