रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांची जाेडी पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर एकत्र दिसणार आहे. या दाेघांचा ‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट 9 सप्टेंबर राेजी सिनेमागृहात प्रदर्शित हाेणार आहे. ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाची बुकिंग 2 सप्टेंबरपासून सुरू करण्यात आली आहे. बुकिंगचा आकडा बघून असे लक्षात येते की, ‘भूल भुलैय्या 2’ आणि साऊथचा ‘आरआरआर’ चित्रपट मागे पडू शकताे. कारण, बुकिंग सुरू झाल्यापासून या चित्रपटाचे ऍडवान्स तिकीटे 1 लाख 31 हजाराहून अधिक विकली गेली आहेत. ऍडवान्स बुकिंग करून अशा प्रकारचा खप करणारा हा बाॅलिवूडचा पहिला चित्रपट आहे. ऍडवान्स बुकिंगद्वारे यांची एकूण कमाई विषयी बाेलायचे झाले, तर त्यांनी जवळपास 6 ते 7 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
‘ब्रह्मास्त्र’ (Brahmastra) चित्रपटाच्या कमाईचा हा वेग बघता, असा अदांज लावला जाताेय की, चित्रपट पहिल्या दिवशी म्हणजेच ओपनिंग डेला धमाकेदार कमाई करेल. चित्रपटाची पहिल्या दिवसाची कमाई लक्षात घेता, हा अंदाज लावला जाताेय की, चित्रपट पहिल्याच दिवशी 25 ते 27 कोटी रुपयांची कमाई करू शकताे. जर असेच झाले, तर हा चित्रपट लॉकडाऊननंतर सिनेमागृहात प्रदर्शित हाेणारा सुपरहिट चित्रपट ‘सूर्यवंशी’च्या ओपनिंगला तगडी टक्कर देऊ शकताे. ‘सूर्यवंशी’ सिनेमाने हिंदीमध्ये जवळपास 26 कोटी रूपयांची कमाई केली हाेती. तरीदेखील चित्रपट निर्मात्यांना खात्री नाही की, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर किती कमाई करेल. कारण, ज्याप्रकारे आमिर खानचा ‘लाल सिंह चड्ढा’ आणि त्यानंतर ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाला लाेक बॉयकॉट करत आहेत. त्याकडे बघून सध्या काहीही बाेलणे कठीण आहे.
View this post on Instagram
बाॅलिवूडमध्ये असे अनेक चित्रपट आहेत, ज्यांनी चित्रपटाच्या ओपनिंग डेला दमदार कमाई केली, परंतु नंतर ते चित्रपट आपटले. चला तर मग जाणून घेऊया त्यात कुठल्या चित्रपटांचा समावेश आहे.
‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’
वृत्तांनुसार, 2018 साली प्रदर्शित झालेला आमिर खानचा ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ या चित्रपटाने ओपनिंग डे जवळपास 48.27 कोटी रुपयांची दमदार कमाई केली हाेती. परंतु त्यानंतर चित्रपट चांगलाच आपटला. पहिल्या दिवशी दमदार कमाई करणारा हा चित्रपट दुसऱ्या दिवशी फारशी कमाई करू शकला नाही. इतकी दमदार कमाई करणाऱ्या या चित्रपटाची एकूण कमाई फक्त 150 कोटींच्या आसपास होती.
‘हिंदुस्तान की कसम’
अजय देवगणचा 1999 साली आलेला ‘हिंदुस्तान की कसम’ हा चित्रपट पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरला होता. टीव्हीवर चित्रपटाच्या प्राेमाेने खूप धुमाकूळ घातला हाेता. या चित्रपटाने 1.45 कोटी रुपयांनी जबरदस्त ओपनिंग केली, परंतु ही स्थिती कायम राहू शकली नाही, आणि चित्रपट बॉक्स ऑफिसवर पडला होता.
‘कोयला’
शाहरुख खानच्या ‘काेयला’ चित्रपटाने 1.06 कोटी रुपयांची धमाकेदार ओपनिंग केली होती. परंतु नंतर दुसऱ्या दिवशी हा चित्रपट चांगलाच ताेंडावर आदळला होता.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
ऑनस्क्रीन रोमान्स करणाऱ्या ऐश्वर्याने सर्वांसमोर झुकून रजनीकांत यांना केला नमस्कार, पाहा व्हिडिओ
रिषभचा पत्ता कट! उर्वशी रौतेला झालीय ‘या’ पाकिस्तानी क्रिकेटरच्या प्रेमात वेडी?
‘या’ अभिनेत्रीने बिकिनी घालून ट्रेनरसोबत केला जबरदस्त योगा; नेटकरीही म्हणाले, ‘उद्या घटस्फोट फिक्स’