Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

हॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आलिया भट्ट? अभिनेत्रीने ‘वंडर वुमेन’ टॅलेंट एजन्सीशी केली डील

गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूरच्या लग्नाची चर्चा सुरू आहे. रणबीर आणि आलिया डिसेंबर २०२१ मध्ये लग्नबंधनात अडकतील असा दावा अनेक अहवालांमध्ये करण्यात आला आहे. माध्यमांमध्ये दावा केला आहे की, रणबीर आणि आलिया जानेवारी २०२२ मध्ये लग्न करणार आहेत. रणबीरसोबतच्या लग्नाच्या तयारीदरम्यान, आलिया लवकरच हॉलिवूडच्या पहिल्या प्रोजेक्टमध्ये सहभागी होणार असल्याचा दावा केला जात आहे. यासाठी ती पूर्णपणे तयार असून, पुढील वर्षाच्या सुरुवातीला ती यात सहभागी होणार आहे.

माध्यमांचा असा दावा आहे की, आलियाने अमेरिकन एजन्सी विल्यम मॉरिस एंडेव्हरशी डील केली आहे. तिचे हॉलिवूडचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ती सज्ज झाली आहे. माध्यमांमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, आलिया हॉलिवूड स्टुडिओशी चर्चा करत आहे आणि लवकरच डीलवर साइन करू शकते. हॉलिवूड प्रोजेक्टची संपूर्ण माहिती समोर आलेली नाही. असे म्हटले जात आहे की, आलिया तिने पाहिलेल्या आणि वाचलेल्या प्रत्येक स्क्रिप्टवर खूप प्रभावित आहे.

माध्यमांतील वृत्तानुसार, आलिया २०२२ सुरुवातीला तिच्या पहिल्या हॉलिवूड प्रोजेक्टची घोषणा करू शकते. एका सूत्राने पुढे दावा केला की, आलियाला स्टार जेनिफर लॉरेन्सची बरोबरी साधायची आहे. आलियाला अनेक ऑफर्स आल्या आहेत, मात्र तिने आधीच्या पात्रावर विशेष भर दिला आहे.

पुढे असा दावा केला जातो की, आलियाने तिच्या हॉलिवूड एजन्सीला या प्रोजेक्टचे पात्र ‘आक्रमक’ दाखवण्यास सांगितले आहे. ज्या हॉलिवूड एजन्सीसोबत आलियाने काम करण्याचे कॉन्ट्रॅक्ट केले आहे. त्यासोबत ‘वंडर वुमेन’ फेम गैल गैडोट, ओपरा विनफ्रे, चार्लीज़ थेरॉन आणि इतर हॉलिवूड अभिनेत्री काम करत आहेत. या सर्व जगातील सर्वात लोकप्रिय अभिनेत्री आहेत.

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर आलिया पुढे ‘गंगुबाई काठियावाडी’ आणि ‘आरआरआर’मध्ये दिसणार आहे. दोन्ही चित्रपट जानेवारी २०२२ मध्ये प्रदर्शित होणार आहेत. याशिवाय तिचा रणबीरसोबत ‘ब्रह्मास्त्र’ आणि रणवीर सिंगसोबत ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-सिल्व्हर रंगाच्या शिमरी गाऊनमधे करिश्मा कपूरचा घायाळ करणारा अंदाज पाहिला का?

-‘दिल तो पागल है’ला २४ वर्षे पुर्ण: कोणाचीही हिंमत नसताना, माधुरीला टक्कर देण्यास तयार झाली होती करिश्मा

-करीनाचा चिमुकला जेह दिसला आत्या सबाच्या मांडीवर खेळताना; पाहा ‘हा’ गोंडस फोटो

हे देखील वाचा