Tuesday, July 9, 2024

‘गंगूबाई काठियावाडी’ची स्क्रिप्ट ऐकल्यानंतर ‘अशी’ होती आलियाची प्रतिक्रिया, स्वत: केला खुलासा

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) सध्या तिच्या ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे. चाहते तिच्या या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. आलिया सध्या ‘गंगूबाई काठियावाडी’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात चाहत्यांना आलियाचा पॉवरपॅक अवतार पाहायला मिळणार आहे. गेल्या महिन्यात प्रदर्शित झालेल्या ट्रेलरनंतर आलियाचा अभिनय पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित या चित्रपटात आलिया एका दमदार भूमिकेत दिसणार आहे. चाहत्यांनी आलियाला अशा भूमिकेत कधीच पाहिले नाही. ज्यामुळे ते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. केवळ आलियाच नाही, तर संपूर्ण टीम चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. दरम्यान, संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांनी चित्रपटाची स्क्रिप्ट सांगितल्यावर तिची पहिली प्रतिक्रिया कशी होती हे आलियाने सांगितले आहे.

 स्क्रिप्ट ऐकून घाबरली होती आलिया भट्ट
आलियाने सांगितले की, “जेव्हा मी स्क्रिप्ट ऐकली तेव्हा मी सरांना सर्व काही विचारले, ज्याची मला भीती वाटत होती. मी त्यांना म्हणाले की, तुम्हाला वाटतं की मी हे करू शकेन? यासाठी मी खूप लहान आहे, असे तुम्हाला वाटत नाही का? ते मला म्हणाले की, मी तुला हे करायला लावेल.” आलिया पुढे म्हणाली की, “त्यावेळी मी स्वतःशीच म्हणाले होते की, जेव्हा असा चित्रपट माझ्या वाट्याला आला, तेव्हा माझ्या मनात शंका येण्यास कोणताही स्कोप नाही. मला स्वतःबद्दल शंका होती, म्हणून मी ते करताना जास्त मेहनत घेत होते.”

आलिया पुढे म्हणाली की, “गंगूबाई काठियावाडी (Gangubai Kathiawadi) ही माझ्या आयुष्यातील संधी होती, मी मनापासून परफॉर्म केले. मी दोन वर्षे गंगूच्या जगात राहिले. चित्रपटाचे शूटिंग संपल्यानंतरही मी चित्रपटाचे व्हिज्युअल पाहायला सरांच्या ऑफिसमध्ये जात असे.”

हा चित्रपट २५ फेब्रुवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. अजय देवगण (Ajay Devgan) ‘गंगूबाई काठियावाडी’मध्ये आलियासोबत महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

हेही वाचा –

हेही पाहा-

हे देखील वाचा