Friday, July 5, 2024

प्रेग्नंसीच्या गोड बातमीनंतर का भडकली आलिया भट्ट? म्हणाली, ‘मी स्त्री आहे, पार्सल नाही’

अनेक बॉलिवूड कलाकार हे आपले खासगी आयुष्य आणि व्यावसायिक आयुष्य या दोन्हीबाबत खूपच गंभीर असतात. त्यांना दोन्ही गोष्टी एकत्र करायला आवडत नाही. यामध्येच अभिनेत्री आलिया भट्ट हिचाही समावेश होतो. एका वृत्तवाहिनीने सांगितले की, आलियाला प्रेग्नंसीमुळे शूटिंगमध्ये उशीर होत आहे. अशात आलियाने एक पोस्ट शेअर करत आपला राग व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे, आलियाने सोमवारी (दि. २७ जून) तिची प्रेग्नंसीची घोषणा केली होती.

आलियाची इंस्टा पोस्ट
आलिया भट्ट (Alia Bhatt) हिने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एका न्यूज वेबसाईटची पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये असे लिहिले आहे की, “आलिया भट्टने सोमवारी सकाळी आपल्या पहिल्या प्रेग्नंसीची घोषणा केल्यापासून ती चर्चेत आली आहे. जुलैच्या मध्यात अभिनेत्री मुंबईत परतणार असल्याचं बोललं जात आहे. अशीही बातमी आहे की, रणबीर कपूर आपल्या पत्नीला घरी आणण्यासाठी यूकेला जाऊ शकतो.”

या पोस्टमध्ये पुढे लिहिले आहे की, “आलिया शूटिंगवरून परतल्यानतंर विश्रांती करणार आहे. रिपोर्टमध्ये असेही समोर आले आहे की, अभिनेत्रीने तिच्या प्रेग्नंसीचे नियोजन अशाप्रकारे केले आहे की, तिच्या कोणत्याही कामावर परिणाम होणार नाही. ती तिच्या ‘हार्ट ऑफ स्टोन’ आणि ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या सिनेमांचे शूटिंग जुलैच्या अखेरीस पूर्ण करणार आहे.”

‘मला विश्रांतीची गरज नाही’
आलियाने या पोस्टवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. तिने आपला राग व्यक्त करत लिहिले की, “आम्ही अजूनही पितृसत्ताक जगात राहतो. कशालाही उशीर झाला नाही. मी एक स्त्री आहे, पार्सल नाही. मला अजिबात आराम करण्याची गरज नाही, पण तुमच्याकडे डॉक्टरांचे प्रमाणपत्रही असेल हे जाणून बरे झाले.”

Alia-Bhatt
Photo Courtesy: YouTube/ScreenGrab/xcel Movies

आलियाने चाहत्यांसाठी लिहिला खास संदेश
पुढे आलियाने लिहिले की, “हे २०२२ आहे. आपण जुनाट विचारातून बाहेर येऊ शकतो का?” ही पोस्ट करण्याच्या काही मिनिटांपूर्वी आलियाने पती रणबीर कपूरसोबतचा एक फोटो शेअर केला होता. आपल्या चाहत्यांचे आभार मानत तिने फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “प्रेमाने भारावून गेलो. मी प्रत्येकाचे संदेश आणि शुभेच्छा वाचण्याचा प्रयत्न केला आहे आणि मला एवढेच सांगायचे आहे की, आपल्या आयुष्यातील इतका मोठा क्षण प्रेम आणि आशीर्वादाने साजरा करणे विशेष वाटते.”

आलिया भट्टच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर ती शेवटची २०२२साली आलेल्या ‘गंगुबाई काठियावाडी’ आणि ‘आरआरआर’ या सिनेमात झळकली होती.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

हे देखील वाचा