बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट सध्या तिच्या ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे. चाहते तिच्या या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. आलिया सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय आहे. चित्रपटांसोबतच, आलिया आजकाल तिच्या लव्हलाईफमुळे देखील चर्चेत आहे. रणबीर कपूरसोबतच्या तिच्या लग्नाच्या चर्चा सध्या जोरात सुरू आहेत. आलिया आणि रणबीरच्या लग्नाची अनेक दिवसांपासून चाहते वाट पाहत आहेत. ते एकमेकांना जवळपास ५ वर्षांपासून डेट करत आहे. दोघांनाही त्यांच्या लग्नाबद्दल अनेकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते. यावर्षी एप्रिलमध्ये दोघेही लग्नाच्या बंधनात अडकणार असल्याची चर्चा सुरू आहे. पण ही बातमी अधिकृत होण्याआधीच आलियाने रणबीर कपूरशी लग्न केल्याची कबुली दिली. हे कळल्यानंतर चाहत्यांना धक्का बसला आहे.
आलियाने रणबीरशी केले लग्न?
आलियाने (Alia Bhatt) तिच्या प्रेमाबद्दल अनेकवेळा ईशारे करत सांगितले आहे. सध्या ती तिचा आगामी चित्रपट ‘गंगूबाई काठियावाडी’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान ती असे काही बोलली की, ज्यानंतर ती पुन्हा चर्चेत आली आहे. आलियाचे लग्न झाले आहे. हे दुसर कोणी नाही, तर खुद्द आलियानेच याचा खुलासा केला आहे.
आलियाने लग्नाबाबत म्हणाली..
तुमचाही या बातमीवर विश्वास असेल, तर आता काळजीपूर्वक वाचा. आलियाने तिच्या लग्नाबद्दल जे काही सांगितले त्यात ट्विस्ट आहे. खर तर, आलियाने माध्यमांना दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले होते की, तिने तिच्या मनात रणबीरशी (Ranbir Kapoor) लग्न केले आहे. ती पुढे म्हणाला की, “मी काही वर्षांपूर्वी रणबीर कपूरसोबत लग्न केले आहे.”
रणवीर लग्नाबाबत म्हणाला…
रणवीर कपूरने नुकतेच आपल्या लग्नाबाबत सांगितले होते की, जर कोरोना नसता तर आलिया आणि त्याचे आतापर्यंत लग्न झाले असते. तो म्हणाला होता की, “माझी गर्लफ्रेंड आलिया एक ओव्हर अचिव्हर आहे. गिटार, पटकथा लेखन असे सर्व कोर्स ती करत आहे, तिच्या तुलनेत मी अंडर अचिव्हर आहे.”
वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर ‘गंगूबाई काठियावाडी’ व्यतिरिक्त आलिया भट्ट लवकरच राम चरण आणि जूनियर एनटीआरच्या ‘आरआरआर’मध्ये दिसणार आहे. त्याचबरोबर रणबीर कपूरसोबत ‘ब्रह्मास्त्र’ आणि रणवीर सिंगसोबत ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’मध्येही दिसणार आहे.
हेही वाचा :
Sunny Leone | सनी लिओनीबद्दल कधीही न ऐकलेल्या गोष्टी, ज्या ऐकून तुमच्याही उंचावतीय भुवया!
अखेर प्रेक्षकांची प्रतीक्षा संपली, शमशेरा चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख आली समोर
यामी गौतमसोबत एका घरात राहायला घाबरायला लागलाय पती आदित्य धर, स्वत: सांगितले कारण