बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टचे (Alia Bhatt) तिच्या ‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रपटासाठी जोरदार कौतुक होत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरमधील तिचा लूक पाहून चाहते तिच्यावर जोरदार कौतुकाचा वर्षाव करत आहेत. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘गंगूबाई काठियावाडी’ आता प्रदर्शनासाठी सज्ज आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरला भरभरून दाद मिळाली असून, आलियाचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटात आलिया मुंबईतील प्रसिद्ध माफिया आणि सेक्स वर्करची भूमिका साकारत आहे. या व्यक्तिरेखेसाठी तिने खूप मेहनत घेतली आहे.
माध्यमांतील वृत्तानुसार, आलियाने गंगूबाईच्या भूमिकेच्या तयारीसाठी मुंबईच्या रेड लाइट एरियातील कामाठीपुरा येथील खऱ्या सेक्स वर्करसोबत बराच वेळ घालवला होता. आलियाने असे केले होते जेणेकरून ती तिच्या पात्रात कामाठीपुराच्या सेक्स वर्करच्या रूपात आणि त्याच बोलीभाषेत बोलताना दिसावी. ६०च्या दशकातील माफिया असलेल्या गंगूबाईही कामाठीपुरामध्ये वास्तव्यास होत्या.
‘गंगूबाई काठियावाडी’मध्ये आलियासोबत अजय देवगण, सीमा पाहवा, विजय राज आणि हुमा कुरेशी देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट यापूर्वी ६ जानेवारी २०२२ रोजी प्रदर्शित होणार होता. पण कोरोना व्हायरसमुळे त्याचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले होते. आता हा चित्रपट २५ फेब्रुवारी २०२२ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
विजय राजचे केले कौतुक
‘गंगूबाई काठियावाडी’च्या ३ मिनिट १५ सेकंदाच्या ट्रेलरची सुरुवात आलियाच्या (Alia Bhatt) पायापासून होते. यानंतर तिच्या हातात वाईन दिसते. पहिला पूर्ण सीन पाहून तुम्हाला असे वाटेल की, निवडणुकीच्या जाहीर सभेचे असे दृश्य तुम्ही यापूर्वीही अनेकदा केले आहे. आलियाने गुजराती उच्चारांसह उच्च पिचमध्ये डायलॉग बोलण्याचा प्रयत्न केला आहे, ज्यामध्ये मराठी टच आहे. या चित्रपटात विजय राजने रजियाबाईची भूमिका साकारली आहे. त्याची स्क्रीन प्रेझेन्स जबरदस्त आहे. सोशल मीडियावरही त्याचे कौतुक होत आहे.
वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर ‘गंगूबाई काठियावाडी’ व्यतिरिक्त आलिया भट्ट लवकरच राम चरण आणि जूनियर एनटीआरच्या ‘आरआरआर’मध्ये दिसणार आहे. त्याचबरोबर रणबीर कपूरसोबत ‘ब्रह्मास्त्र’ आणि रणवीर सिंगसोबत ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’मध्येही दिसणार आहे.
हेही वाचा :