Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

अभिनेता रणबीर क्षणभरही राहत नाही आलिया भट्टपासून दूर, लग्नाबद्दल सांगितली ‘ही’ गोष्ट

मनोरंजन विश्वात सध्या लग्नाचा सिझन सुरू आहे. अनेक अभिनेते अभिनेत्री विवाहबंधनात अडकणार आहेत. अशातच बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूरच्या लग्नाची चर्चा सुरू आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, दोघेही पुढच्या वर्षी लग्न करू शकतात. आलिया सध्या अनेक प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहे. सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या आलियाने तिच्या युट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती तिचा दिवस कसा घालवते याची झलक तिच्या चाहत्यांना दाखवण्यात आली आहे.

आलिया सांगते की, अशा गोष्टी दाखवण्यात आणि सांगताना तिला थोडा संकोच वाटतो. कारण ती किती व्यस्त आहे हे लोकांना दाखवायचे नाही. आलियाच्या चाहत्यांनीही तिला लग्नाबद्दल विचारले, तेव्हा तिने तिच्याच स्टाईलमध्ये उत्तर दिले.

आलिया व्हिडिओच्या सुरुवातीला तिची मैत्रीण आकांक्षा रंजन कपूरसोबत एका मॅट्रेस ब्रँडच्या जाहिरातीचे शूटिंग करताना दिसत आहे. सकाळचे ७ वाजले आहेत आणि आलियाने खुलासा केला आहे की, ती पहाटे ५ वाजता उठली आणि शूटला जाण्यापूर्वी तिने वर्कआउट केला. आकांक्षासोबतच्या शूटिंगच्या उत्साहाबद्दल बोलताना आलिया म्हणते की, “मी पहिल्यांदाच माझ्या बेस्ट फ्रेंडसोबत शूटिंग करत आहे. आम्ही एकत्र एका जाहिरातीचे शूटिंग करत आहोत आणि आमचा दुसरा मित्र अभिषेक वर्मन याने त्याचे दिग्दर्शन करत आहे.”

व्हिडिओच्या मधोमध आलिया तिच्या चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरेही देत ​​आहे. जेव्हा एका चाहत्याने विचारले की, तुम्हाला कशामुळे प्रेरणा मिळते, तेव्हा आलियाने उत्तर दिले, “दोन गोष्टी, माझी स्वतःसाठीची स्वप्ने मला दररोज कठोर परिश्रम करण्यास प्रेरित करतात आणि इतर लोक जे माझ्या आयुष्यात आहेत, माझी टीम, माझे मित्र, माझे कुटुंब, माझे प्रियजन, दररोज मला एक चांगली व्यक्ती बनण्यासाठी प्रेरित करतात.”

यादरम्यान, एका चाहत्याने आलियाला विचारले की, ती तिच्या फोनच्या वॉलपेपरवर काय ठेवते? या प्रश्नाचे उत्तर म्हणून आलियाने तिचा फोन कॅमेराकडे वळवला. ज्यामध्ये फोनच्या वॉलपेपरवर आलिया आणि रणबीरचा फोटो दिसत होता. याशिवाय आलियाने तिच्या शेवटच्या गुगल सर्चबद्दल सांगितले, जे शिमला मिरचीबद्दल होते. यावेळी आलिया आणि आकांक्षा खूप हसताना दिसत आहेत.

https://youtu.be/SpQviErt1GA

शेकडो लोकांनी आलियाला ती लग्न कधी करणार आहे, असे अनेक प्रश्न विचारले. या प्रश्नाचे थेट उत्तर न देता तिने फक्त मान हलवली. माध्यमांतील वृत्तांनुसार, रणबीर कपूर आणि आलिया त्यांच्या प्रोफेशनल कमिटमेंट पूर्ण करून पुढील वर्षी उन्हाळ्यात लग्न करू शकतात.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-जबरदस्त! एनएफटी मार्केटमध्ये चित्रपट विकणारे राम गोपाल वर्मा ठरले पहिले निर्माते, एकाच झटक्यात कमावले…

-कर्नाटक वन विभागातील हत्तीच्या पिल्लाला देण्यात आले सुपरस्टार पुनीत राजकुमारचे नाव, सदैव राहणार आठवणीत

-वडिलांची परवानगी मिळाली असती, तर सलमान असता जुहीचा पती; लग्नासाठी हात मागायलाही गेला होता, पण…

हे देखील वाचा