Monday, July 1, 2024

रणबीरला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आलियाने केला रोमँटिक फोटो शेअर; मनातील भावनाही केल्या व्यक्त

बॉलिवूडमध्ये अनेक जोड्या आहेत. प्रत्येक जोडीला प्रचंड फॅन फॉलोविंग आहे. प्रत्येक जोडीची एक वेगळी आणि विशेष खासियत आहे. मात्र तरीही या सर्व जोड्यांच्यावर एक जोडी आहे, जिची गोष्ट औरच आहे. ती जोडी आहे आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांची. बॉलिवूडची बबली गर्ल आणि बर्फी बॉय अशी ही गोड जोडी नेहमीच फॅन्ससोबत सर्वच प्रेक्षकांमध्ये त्यांच्याबद्दल कुतूहल निर्माण करत असते.

आलिया आणि रणबीर दोघेही सुपरस्टार आहेत, त्यामुळे साहजिक दोघांचे लोकप्रियतेचे, प्रसिद्धीचे, फॅन्सचे एक वेगळे वलय आहे. असे असूनही जेव्हा या दोघांची एकत्र बातमी येते तेव्हा सर्व गोष्टी एक होतात. आज रणबीर त्याचा ३९ वा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्ताने त्याला संपूर्ण जगातून शभेच्छा मिळत आहे. मात्र असे असूनही सर्वांनाच एका खास व्यक्तीच्या शुभेच्छांची अपेक्षा होती. ती खास व्यक्ती म्हणजे आलिया भट्ट.

आलियाने नुकताच तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक फोटो पोस्ट करत रणबीरला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याला शुभेच्छा देताना आलियाने रणबीरसोबतच तिचा एक रोमॅंटिक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये एका नदीच्या काठावर दोघे बसलेले दिसत असून, सूर्यास्ताचा आनंद घेत आहे. अतिशय रोमँटिक असलेला हा फोटो तुफान व्हायरल होत आहे. खूपच कमी वेळात फोटोला १२ लाखांपेक्षा अधिक लाईक्स आले असून, हजारो कमेंट्स आल्या आहेत.

आलियाने हा फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले की, “हॅप्पी बर्थडे माय लाईफ” आणि सोबत हार्ट ईमोजी पोस्ट केल्या आहेत. तिने पोस्ट केलेला हा फोटो पाठमोरा असून, अतिशय शांत आणि निवांत वातावरणात आलिया रणबीरच्या खांद्यावर डोके ठेऊन रोमॅंटिक संध्याकाळ आणि सूर्यास्ताचा आनंद घेत आहे. हा फोटो पोस्ट करताना आलियाने तिचे प्रेम जगासमोर कबूल केले आहे. एवढेदिवस या दोघांच्या रिलेशनशिपच्या बातम्या येत असल्या तरी जगासमोर त्यांनी त्यांचे नाते कधीच मान्य केले नव्हते. मात्र आज रणबीरच्या वाढदिवसाच्या दिवशी आलियाने तिच्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत.

हे दोघं राजस्थानमधील जोधपूर येथे असून, आलियाने पांढऱ्या रंगाचा टॉप घातला असून, रणबीरने ग्रे रंगाचाच टि शर्ट, जीन्स आणि टॉप घातली आहे. येणाऱ्या बातम्यांनुसार हे दोघं जोधपूर येथे त्यांच्या लग्नाचे लोकेशन बघण्यासाठी गेले आहेत. यावर्षीच ते लग्न करणार असलयाचे बोलले जात आहे. आता या बातम्यांमध्ये किती तथ्य आहे हे लवकरच समजेल. तत्पूर्वी सध्या आलिया आणि रणबीर एकमेकांसोबत वेळ घालवत आहे.

 

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-राज कपूर यांनी ‘कुरूप’ मुलगी म्हणून केला होता लता मंगेशकरांचा उल्लेख; पुढे विनंती करूनही ‘गानकोकिळे’ने…

-कॅटरिना ते प्रियंकापर्यंत ‘या’ अभिनेत्री होत्या चॉकलेट बॉयच्या प्रेमात; तर ऐश्वर्याची केली होती अभिनेत्याने फसवणूक

-विक्की कौशलच्या ‘सरदार उधम’ चित्रपटाचा टीझर रिलीझ, पाहायला मिळाला अभिनेत्याचा जबरदस्त लूक

हे देखील वाचा