Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

आलिया भट्टचा बिकिनीतील ग्लॅमरस अंदाज! खास मैत्रिणीला दिल्या वाढिवसाच्या खास शुभेच्छा

बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्ट ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती नेहमीच तिचे नवनवीन फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांबरोबर शेअर करत असते. आलियाचे चाहते देखील तिने पोस्ट शेअर करण्याची आतुरतेने वाट पाहत असतात. आता आलियाने नुकताच एक फोटो शेअर केला आहे. तो फोटो पाहून चाहते घायाळ झाले आहेत. या फोटोमध्ये आलिया तिच्या बेस्ट फ्रेंडसोबत सुट्टी एंजॉय करताना दिसत आहे. ती आणि तिची मैत्रीण या फोटोमध्ये खूप हॉट दिसत आहे.

आलियाने शेअर केलेल्या या फोटोमध्ये तिने गुलाबी पांढऱ्या रंगाची बिकिनी आणि  ट्रान्सरंट शॉर्ट्स परिधान केला आहे. फोटोमध्ये आलिया समुद्रकिनाऱ्यावर खुप ग्लॅमरस अंदाजात बसलेली दिसत आहे. तिच्या चेहऱ्यावरील हास्य सांगत आहे की, तिच्यासाठी हा क्षण खूप आनंदाचा होता. तिच्यासोबत तिची मैत्रिण आकांक्षाही बसलेली दिसत आहे. तिने जांभळ्या रंगाची बिकिनी परिधान केली आहे.

 

आलियाच्या चाहत्यांना समुद्रकिनारी वाळूवर बसलेल्या या दोन्ही मैत्रिणींचा फोटो प्रचंड आवडत आहे. आलियाने तिच्या मैत्रिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मालदीवच्या सुट्टीतील तिचा हा थ्रोबॅक फोटो शेअर करून तिने तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हा फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

कोण आहे आलियाची बेस्ट फ्रेंड
या फोटोमध्ये आलिया आपल्या बेस्टफ्रेंडसोबत बसलेली दिसत आहे. तिच्या बेस्टफ्रेंडचे नाव आकांक्षा रंजन आहे. या दोघी बालपणीच्या मैत्रीणी आहेत. या दोघी सतत एकत्र दिसत असतात. मग ती पार्टी असो किंवा कार्यक्रम असो, आलिया आकांक्षाला सोबत घेऊन जात असते.

मैत्रीणीसाठी लिहिला खास मेसेज
आलियाने या फोटोला सुंदर कॅप्शन देखील दिलं आहे. तिने या कॅप्शनद्वारे तिच्या मैत्रीणीला शुभेच्छा दिल्या आहेत. आलियाने कॅप्शनमध्ये लिहिले की, “हॅपी बर्थडे मेरी दुनिया.” ( हॅपी बर्थडे माझ जग) अस कॅप्शन देत तिने मैत्रिणीसाठी एक खास मेसेज लिहिला आहे. यातूनच आपल्याला समजू शकतो की, आलियासाठी तिची मैत्रीण किती खास आहे. आलियाचे चाहते या फोटोंना खूप पसंती देत आहेत. या फोटोला आतापर्यंत १५ लाखांपेक्षा जास्त लाईक मिळाले आहेत.

आलियाचे आगामी चित्रपट
वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झाल तर, आलिया आता ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. याव्यतिरिक्त ती ‘गंगूबाई काठियावाडी’, ‘ब्रह्मास्त्र’, ‘डार्लिंग्स’, ‘आरआरआर’, ‘जी ले जरा’ या चित्रपटांमध्येही दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘बिग बॉस मराठी ३’ मध्ये स्पर्धकांचे झाले दणक्यात स्वागत, आहेत लोकप्रिय कलाकार

-‘बिग बॉस मराठी ३’च्या ग्रँड प्रीमियरला सुरुवात, ‘सिद्धू’ करतोय होस्टिंग, तर ‘या’ दोन स्पर्धकांची एन्ट्री

-गुलाबी रंगाच्या शॉर्ट ड्रेसमध्ये अन्विता दिसतेय एकदम ‘बार्बी डॉल’, कलाकारांकडून कौतुकाचा वर्षाव

हे देखील वाचा