भोजपुरी चित्रपटांची सुपरहिट अभिनेत्री आम्रपाली दुबे हिची गणना इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्रींच्या यादीत केली जाते. आम्रपालीने तिच्या करिअरमध्ये आतापर्यंत अनेक हिट भोजपुरी चित्रपट दिले आहेत. त्याचबरोबर तिने जवळपास प्रत्येक सुपरस्टारसोबत स्क्रीन शेअर केली आहे. अभिनयासोबतच आम्रपाली सोशल प्लॅटफॉर्मवरही खूप सक्रिय आहे. नुकताच आम्रपाली दुबेने तिचा ३५ वा वाढदिवस साजरा केला. यावेळी तिच्या चाहत्यांनी तिचे जोरदार अभिनंदन केले. त्याचवेळी अभिनेता दिनेश लाल यादव निरहुआने आम्रपालीला तिच्या वाढदिवसानिमित्त एक अतिशय मौल्यवान आयफोन भेट दिला. दरम्यान, आता आम्रपालीच्या ग्लॅमरस फोटोंनी इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे.
आम्रपालीने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर वाढदिवसानंतरचे तिचे नवीन फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती खूपच ग्लॅमरस दिसत आहे. फोटोंमध्ये तुम्ही पाहू शकता की, आम्रपालीने हिरव्या रंगाचा अतिशय हॉट आणि शॉर्ट वनपीस परिधान केला आहे. या फोटोंमध्ये ती वेगवेगळ्या स्टाईलमध्ये बोल्ड पोझ देताना दिसत आहे आणि तिने तिचे केस मोकळे सोडले आहेत.
काही फोटोंमध्ये आम्रपाली खूपच नॉटी दिसत आहे. नेहमीप्रमाणेच आम्रपालीचे हे फोटोही चाहत्यांना खूप आवडत आहेत. त्याचवेळी, चाहते सतत फोटोवर कमेंट करून त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिले, “आणि इथे मी पुन्हा वितळलो…” दुसरीकडे, दुसरा युजरने लिहिले की, “एकदम झकास.” इतर युजर्स हॉट, ब्युटीफुल, फायर अशा कमेंट करून तिचे कौतुक करत आहेत.
भोजपुरी अभिनेत्री आम्रपाली दुबेच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर ती लवकरच ‘लव्ह विवाह डॉट कॉम’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित होताच चांगलाच व्हायरल झाला आहे. यामध्ये युवा स्टार प्रदीप पांडे चिंटू आणि भोजपुरी अभिनेत्री आम्रपाली दुबे एकत्र दिसत आहेत. या पोस्टरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. कारण पहिल्यांदाच चिंटू आणि आम्रपाली एका मोठ्या चित्रपटात एकत्र रोमान्स करताना दिसणार आहेत.
हेही वाचा :
- अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा : द राइज’ हिंदीत पाहण्यासाठी पाहावी लागेल वाट, रिलीझची डेट लांबणीवर
- राजकीय भुमिका घेतल्याने अभिनेता किरण मानेची मालिकेतून हकालपट्टी? सोशल मीडियावर संतापाची लाट
- सुभाष घई यांनी ‘राम-लखन’ सिनेमाच्या रिमेकवर स्पष्ट केले त्यांचे मत, ‘मी नाही तर…