Wednesday, July 3, 2024

कडकच ना! आम्रपाली दुबे ते प्रियांका पंडित, ‘या’ भोजपुरी अभिनेत्रींनी आपल्या ठुमक्यांनी केलंय सर्वांनाच घायाळ

भोजपुरी इंडस्ट्रीमध्ये देखील बॉलिवूडप्रमाणे एकापेक्षा एक अभिनेत्री आहेत, ज्या आपल्या अदाकारीने चाहत्यांचे मने जिंकून घेतात. मग ते सौंदर्याच्या बाबतीत असो वा अभिनयाच्या. या भोजपुरी अभिनेत्री आपल्या ग्लॅमरस अंदाजाने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतात, त्यामुळेच भोजपुरीमधील कोणतेही गाणे प्रदर्शित होताच ते अल्पावधीतच तुफान व्हायरल होते. अशात आपण आम्रपाली दुबेपासून प्रियांका पंडितपर्यंत त्या सुंदरींची ओळख करून घेणार आहोत, ज्यांनी आपल्या डान्सने लाखो प्रेक्षकांना वेड लावले आहे.

मोनालिसा
अभिनेत्री मोनालिसा आता भोजपुरीमध्ये कमी दिसत असेल, पण जेव्हा ती येते, तेव्हा सर्वांनाच आश्चर्यचकित करते. इंडस्ट्रीतील हॉट आणि बोल्ड अभिनेत्रींमध्ये तिची गणना होते. ती तिच्या बोल्ड स्टाईलने लाखो प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य करते.

प्रियांका पंडित
व्हायरल एमएमएसमुळे प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री प्रियांका पंडित तिच्या बोल्ड अभिनयासाठीही ओळखली जाते. आयटम नंबरही तिच्यावर चित्रित केला जात आहे. ती तिच्या स्टाईलने त्यात जीव फुंकते. प्रेक्षकांना वेड लावण्यात ती यशस्वी झाली आहे.

सीमा सिंग
भोजपुरी ‘आयटम क्वीन’ म्हटली जाणारी अभिनेत्री सीमा सिंग आज भलेही अभिनयापासून दूर असेल, पण एक काळ असा होता, जेव्हा ती तिच्या डान्सने लाखो प्रेक्षकांना वेड लावायची. तिचे जुने व्हिडिओ आजही इंटरनेटवर वर्चस्व गाजवत आहेत.

राणी चॅटर्जी
भोजपुरी अभिनेत्री राणी चॅटर्जी आता भोजपुरी चित्रपटांमध्ये कमी दिसत असली, तरी ती तिच्या अभिनयाच्या जोरावर राज्य करते. तिच्या बोल्ड ॲक्ट्सला चाहत्यांनी खूप पसंती दिली आहे. तिने चित्रपटांमध्येही बोल्ड अभिनयाची जादू चालवली आहे.

सुरभी सिंग
भोजपुरीतील टॉप अभिनेत्रींपैकी एक सुरभी सिंग तिच्या बोल्ड सीन्ससाठी ओळखली जाते. तिने चित्रपटांमध्ये एकापेक्षा एक आयटम नंबर दिले आहेत आणि त्यामध्ये तिच्या स्टाईलला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले आहे.

स्वीटी छाबरा
भोजपुरी अभिनेत्री स्वीटी छाबरा भारतीय आणि पाश्चात्य अशा दोन्ही प्रकारच्या पोशाखांमध्ये अप्रतिम दिसते.

सोशल मीडियावरही ती खूप सक्रिय असते. ती अनेकदा चित्रपटांमध्ये बोल्ड सीन्सने चाहत्यांची मने जिंकते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘तुला उर्फीचा आजार चढलाय काय?’ विचित्र ड्रेसमुळे काजोल आली ट्रोलर्सच्या निशाण्यावर

-मोठा भाऊ घरी येण्याच्या बातमीने अबराम खान झाला भलताच खुश, व्हिडिओ होतोय जोरदार व्हायरल

-‘अशी’ होती जामीन मंजूर झाल्यानंतर आर्यनची पहिली प्रतिक्रिया, वाचा कर्मचाऱ्यांसह कैद्यांना काय म्हणाला?

हे देखील वाचा