Friday, December 27, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘वीरशिवाय आता मी अपूर्ण’, अमृता रावने शेअर केला क्यूट फोटो आणि मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

आईवडिलांसाठी नेहमीच आपली मुलं सर्वात आधी येतात आणि ती खूप खास देखील असतात. मग आईवडील सामान्य असो किंवा सेलेब्रिटी असो त्यांचे मुलांबद्दल असणारे प्रेम सारखेच असते. आपल्या बाळाचा पहिला वाढदिवस पालकांसाठी नेहमीच खास असतो. आजच्या सोशल मीडियाच्या काळात कलाकार म्हणा किंवा सामान्य लोकं सर्वच आपल्या आप्तजनांच्या वाढदिवसाच्या पोस्ट शेअर करतात. कलाकारांच्या अशा पोस्ट नेहमीच व्हायरल होतात.

सोज्ज्वळ आणि निरागस अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमृता रावने नुकतीच तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. सोमवारी (१ नोव्हेंबर) रोजी अमृताचा मुलगा वीर एक वर्षाचा होत आहे. या निमित्ताने अमृताने सोशल मीडियावर एक खास आणि सुंदर पोस्ट शेअर केली आहे. यापोस्टमध्ये एका मेसेजसोबत तिने त्यांच्या कुटुंबाचा क्युट आणि आकर्षक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये अमृता, आरजे अनमोल आणि वीर दिसत आहे. या तिघांनीही पांढऱ्या रंगाचे कपडे घातले असून, अमोलने वीरला वर उचले आहे. अतिशय मोहक आणि कॅनडिड असणारा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

हा फोटो पोस्ट करत तिने लिहिले की, “आज वीर एक वर्षाचा झाला, आणि त्यासोबतच अमी देखील आईबाबा म्हणून एक वर्षाचे झालो आहोत. आम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, तुमच्या आशीर्वाद आणि प्रेमाची आशा करतो.” यासोबतच तिने ‘वीर’ हा हॅशटॅग देखील दिला आहे. अमृताने एका मुलाखतीमध्ये सांगितले की, “वीरसोबतच माझ्यातली आई देखील एक वर्षाची झाली आहे. मला आईपण दिल्याबद्दल वीरचे आभार. कोरोनामुळे आम्ही त्याच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन फक्त कुटूंब आणि जवळच्या लोकांसोबत करणार आहोत. वीरसाठी एक छानसा ऍनिमल टीमचा केक तयार केला असून, संपूर्ण घराला फुग्यांनी सजवण्यात येणार आहे. याशिवाय वीरकडून त्याच्या पहिल्या वाढदिवशी एनजीओमध्ये दान देखील केले जाणार आहे. तो एनजीओ लहान मुलं आणि वृद्धांच्या मोतीबिंदू सर्जरीसाठी मदत करतो. हेच आमच्याकडून वीरसाठी गिफ्ट असेल.”

यासोबतच पुढे अमृता म्हणाली की, “मागील १८ महिन्यांपासून ती सलग ८ तास देखील झोपू शकली नाहीये. मी कॉफी आणि अजून त्याला पोटासाठी सूट न होणाऱ्या गोष्टीदेखील मी खायच्या सोडून दिल्या. मी माझ्या कामाचे वेळापत्रक वीरच्या वेळापत्रकाला समोर ठेऊनच तयार करते. मी त्यासाठी बेबी फुडदेखील तयार करते. आता वीरशिवाय माझे जग अपूर्ण आहे.”

अमृताने आरजे अनमोलसोबत लग्न केले आहे. जवळपास ७ वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी लग्न केले. त्यांचे लग्न खूपच गुप्त पद्धतीने झाले आणि नंतर तिने सोशल मीडियावर माहिती दिली.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-प्रभावी अभिनेत्री असणाऱ्या टिस्का चोप्राने अनेक शॉर्ट फिल्म्सचे लिखाण करत स्वतःला सिद्ध केले उत्तम लेखिका

-वयाच्या पंधराव्या वर्षी फिल्मफेयरने सन्मानित झालेल्या पद्मिनी कोल्हापुरे यांनी एकविसाव्या वर्षी पळून जाऊन केले होते लग्न

-कोणी उडवला थरकाप, तर कोणी पाडली भुरळ; पाहा ‘या’ अभिनेत्रींचा लक्षवेधी ‘हॅलोविन लूक’

हे देखील वाचा