Saturday, August 9, 2025
Home मराठी ‘नगाडा संग ढोल बाजे’ गाण्यावर अमृता खानविलकरने केले गरबा नृत्य; पाहून तुमचेही थिरकतील पाय

‘नगाडा संग ढोल बाजे’ गाण्यावर अमृता खानविलकरने केले गरबा नृत्य; पाहून तुमचेही थिरकतील पाय

गुरुवारी (७ ऑक्टोबर) सर्वत्र घटस्थापना झाली आहे. नवरात्रीचे हे नऊ दिवस सगळ्यांच्या आयुष्यात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आणतात. या नऊ दिवसात स्त्री शक्तीचा जागर केला जातो. तसेच दुर्गामातेची देखील आराधना केली जाते. चित्रपटसृष्टीतील अनेक अभिनेत्रींनी नवरात्रीच्या पहिल्याच दिवसाच्या पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करून सगळ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. नवरात्रीमधील सर्वात आकर्षित करणारी गोष्ट म्हणजे, देवीचा जागर करण्यासाठी रात्री गरबा तसेच दांडिया खेळल्या जातात. राजस्थानमध्ये या खेळाचा प्रकार प्रामुख्याने दिसून येतो. तसेच आपल्या महाराष्ट्रात देखील देवीचा जागर करण्यासाठी खेळ खेळले जातात. अशातच मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकरने गरब्याचा एक अफलातून डान्स परफॉर्मन्स शेअर केला आहे.

अमृताने सोशल मीडियावर अकाऊंटवर तिचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, तिने पिवळ्या रंगाची चोली आणि पांढऱ्या रंगाचा स्कर्ट घातला आहे. या व्हिडिओमध्ये ती ‘नगाडा संग ढोल बाजे’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. तसेच तिच्यासोबत दोन बॅकग्राउंड डान्सर देखील दिसत आहेत. तिचा हा डान्स पाहून सगळ्यांना नवरात्रीच्या उत्सवात गेल्याची भावना येईल. (Actress amruta Khanvilkar share her dance video on social media)

अमृताचा हा डान्स तिच्या चाहत्यांना तर आवडलाच आहे, सोबतच कलाकार देखील या व्हिडिओवर त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. या व्हिडिओवर अभिनेत्री सोनाली खरे हिने “माईंड ब्लोईंग गर्ल,” अशी कमेंट केली आहे. तसेच तिचे बाकी चाहते हार्ट तसेच फायर ईमोजी पोस्ट करत आहेत.

अमृताच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने अनेक मराठी चित्रपटात काम केले आहे. तिने ‘नटरंग’, ‘चोरीचा मामला’, ‘वेलकम जिंदगी’, ‘बाजी’, ‘वेल डन बेबी’ या चित्रपटात काम केले आहे. तसेच तिने ‘जीवलगा’ या लोकप्रिय मालिकेत देखील काम केले आहे. या मालिकेत तिचासोबत स्वप्नील जोशी, सिद्धार्थ चांदेकर आणि मधुरा देशपांडे हे कलाकार होते. यासोबत अमृता ही एक उत्कृष्ट डान्सर देखील आहे. तिची ‘नटरंग’ या चित्रपटातील ‘वाजले की बारा’ ही लावणी खूप प्रसिद्ध झाली होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘मिठीत जाऊन तुझ्या मिटावे…’, स्पृहा जोशीच्या फोटोसोबत कॅप्शननेही वेधले चाहत्यांचे लक्ष

-देखणं रूप! हिरव्या बांगड्या, कपाळावर टिकली अन् पिवळी साडी नेसून राजेश्वरीने दिल्या नवरात्रीच्या शुभेच्छा

-बोल्ड ऍंड ब्यूटीफुल! सई ताम्हणकरच्या हॉटनेसने नेटकरी झाले पुरते वेडे; फोटोवर पडतोय लाईक्सचा पाऊस

हे देखील वाचा