Monday, July 15, 2024

‘चंद्रा’साठी प्रचंड मेहनत घेतेय अमृता, नाक टोचताना डोळ्यात तरळले अश्रु! व्हिडिओ होतोय व्हायरल

सध्या अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) तिच्या आगामी चंद्रमुखी चित्रपटामुळे सर्वत्र चर्चेत आहे. चित्रपटात अमृता खानविलकर एका ठसकेबाज तमाशा फडातील नृत्यांगणाची भूमिका साकारणार आहे. तर तिच्या सोबत अभिनेता आदिनाथ कोठारे (Aaditya Kothare) दौलतराव देशमानेच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटात चंद्रा आणि राजकारणातील प्रतिष्ठित रांगडं व्यक्तिमत्व असलेल्या दौलतरावांची प्रेमकथा दाखवली आहे. ज्यामध्ये दोघांच्या प्रेमात येणारे अडथळे आणि समाजाचा विरोध झुगारुन त्यांनी केलेले लग्न यांची सुंदर कथा दाखवण्यात आली आहे. सध्या अमृता खानविलकरचा एक व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होत आहे ज्यामध्ये तिने चंद्रमुखीच्या ठसकेबाज भूमिकेसाठी नाकात नथ घालण्याचा अनुभव सांगितला आहे.

अभिनेत्री अमृता खानविलकरने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तिने सांगितले की, चित्रपटातील चंद्राच्या भूमिकेसाठी प्रसाद ओकने खोट्या नथ घालायचे नाही, असे सांगितले होते. या व्हायरल व्हिडिओमध्ये अमृता नाक टोचताना दिसत आहे. यावेळी तिच्या चेहऱ्यावर भिती स्पष्ट दिसत आहे. ज्यावेळी तिने ही नथ घातली तेव्हा तिला वेदना झाल्याने तिच्या डोळ्यात अश्रु तरळलेले ही या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे. या व्हिडिओसोबत अमृताने “नथ आणि चंद्रमुखी माझ्या दिग्दर्शकाला सगळं काही ओरिजनल हवं होत. तेव्हा अमृता नाक टोचायचं क्लिप वाल्या नथ मी घालू देणार नाही असे सांगितले होते. त्यामुळे मी अडीच वर्षापूर्वीच असे नाक टोचले होते. परंतु ते बुजलं म्हणून परत टोचावं लागलं.” असे सांगत तिचा नथ घालण्याचा अनुभव आणि  या भूमिकेसाठी घेतलेले कष्ट वर्णित केले आहे.

अमृताचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होत आहे. तर तिच्या अनेक चाहत्यांनी यावर भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. दरम्यान प्रसाद ओक (Prasad Oak) दिग्दर्शित चंद्रमुखी चित्रपटाची कथा विश्वास पाटील यांच्या चंंद्रमुखी या कादंबरीवर आधारित आहे. हा चित्रपट २९ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या बहुचर्चित चित्रपटाची प्रेक्षकांना जोरदार उत्सुकता लागली आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा –

हे देखील वाचा