Monday, July 1, 2024

‘समाजाला तुमच्यासारख्या आईची गरज…’, अनन्या पांडेच्या बहिणीने शेअर केला बॉयफ्रेंडसोबतचा हॉट फोटो, आईच्या प्रतिक्रियेने वेधले लक्ष

बॉलिवूड कलाकारांच्या कुटुंब नेहमीच चर्चेच असते. असेच काहीसे अभिनेत्री अनन्या पांडेबाबतही आहे. अनन्याची बहीण अलाना पांडे बॉलिवूड सेलिब्रिटी नसली, तरीही ती सोशल मीडियावर चांगलीच प्रसिद्ध आहे. अलाना एक यूट्यूबर आणि ट्रॅव्हेलर आहे. ती आपल्या बॉयफ्रेंडसोबत नेहमीच फिरतीवर असते. यासोबतच यादरम्यानचे काही किस्सेही यूट्यूबवर शेअर करत असते. ती आपल्या फॉलोवर्सनाही आपल्या आयुष्यातील गोष्टींची माहिती देत असते. नुकतेच तिने आपला बॉयफ्रेंड इवॉरसोबत काही हॉट फोटो शेअर केले. यावर तिच्या आईने केलेल्या कमेंटने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

अलानाने शेअर केला क्रिएटिव्ह फोटो
अलानाने आपल्या अधिकृत इंस्टाग्रामवर एक क्रिएटव्ह फोटो शेअर केला आहे. यामध्ये एका फोटोत अर्धीच दिसत आहे. तिने फोटो शेअर करत लिहिले की, “माझा अर्धा भाग पाहण्यासाठी फोटो स्वाईप करा.” तिचा हा फोटो स्वाईप केल्यानंतर तिचा बॉयफ्रेंड दिसत आहे. तिच्या या फोटोवर चाहत्यांसोबतच तिच्या आईनेही कमेंट केली आहे.

तिची आई डीएन पांडे यांनी या फोटोवर कमेंट करत ‘क्यूटीज’ असे लिहिले आहे.

मालदीवमध्ये एन्जॉय करत आहे अलाना
आणखी एका फोटोत अलाना तिच्या बॉयफ्रेंडसोबत दिसत आहे. हा फोटो मालदीवचा आहे. यावरी अलानाच्या आईने हार्ट इमोजी पोस्ट केला आहे. एका युजरने कमेंट करत लिहिले की, ‘समाजाला तुमच्यासारख्या आईची गरज आहे.’

लिव्ह इनमध्ये राहण्यावर अशी होती प्रतिक्रिया
अलानाने एका मुलाखतीत सांगितले होते की, तिचे पालक खूप मोकळ्या विचाराचे आहेत. तिने जेव्हा आपल्या बॉयफ्रेंडसोबत लिव्ह इनमध्ये राहण्याचा निर्णय घेतला होता, तेव्हा तिची आई खूप उत्साहित झाली होती.

अनन्या पांडे आणि अलाना या एकमेकींच्या चुलत बहिणी आहेत. अनन्याने बॉलिवूडमध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे, तर दुसरीकडे अलाना ही एक इंटरनेट सेलिब्रिटी आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘हे तर श्रीमंतांचं हेल्मेट’, अभिनेत्री उर्वशी रौतेलाने घातलेल्या डायमंड मास्करेडवर युजर्सची प्रतिक्रिया

-खरंच! राहुल वैद्य आणि दिशा परमारने केले गुपचुप लग्न? फोटो पाहून चाहते करतायत अभिनंदन

-धक्कादायक! बिग बॉस कन्नडच्या माजी कंटेस्टेंटचा फिनाईल पिऊन आत्महत्येचा प्रयत्न; सासरच्यांवर केले गंभीर आरोप

हे देखील वाचा