Saturday, April 19, 2025
Home बॉलीवूड ‘इथे सूर्यप्रकाश येतोय…’, म्हणत अनन्या पांडेने शेअर केले घायाळ करणारे ‘ब्लॅक ऍंड व्हाईट’ फोटोशूट

‘इथे सूर्यप्रकाश येतोय…’, म्हणत अनन्या पांडेने शेअर केले घायाळ करणारे ‘ब्लॅक ऍंड व्हाईट’ फोटोशूट

बाॅलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे अभिनयाबरोबर सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते. तसेच ती मनोरंजन विश्वात कायम चर्चेत असते. अनन्याने अगदी कमी कालावधीत दिवसांमध्ये स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अनन्या तिच्या सोशल मीडियावर अकाउंटवरुन फोटो आणि व्हिडिओ शेअर करताना दिसते. अनन्या प्रसिद्ध अभिनेता चंकी पांडेची मुलगी आहे. पण तिने अभिनयाच्या जोरावर इंडस्ट्रीत स्वतःचे नाव कमावले. ती तिच्या ग्लॅमरस लूकमुळे अनेक चाहत्यांची मने जिंकते. अनन्याने अलिकडेच फोटोशूट केलं आहे. तिचे फोटोशूट पाहुन चाहत्यांच्या ह्रदयाचा ठोकाच चुकला आहे.

अनन्याने तिचे काही फोटो इंस्टाग्रामवर अकाउंटवरुन शेअर केले आहेत. तिचा हे फोटो ब्लँक अँड व्हाईट आहेत. अनन्या सुर्य प्रकाशाचा आनंद घेत हे अनोखे फोटोशूट केले आहे. या फोटोंमध्ये अनन्याने टी-शर्ट घातला आहे. तसेच केस मोकळे सोडले आहे. अनन्याने फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले की,“इथे सूर्यची किरण येत आहेत.” अनन्याच्या फोटोशूटवर नव्या नवेली नंदाने कमेंट करताना हार्ट ईमोजी पोस्ट केल्या आहेत. तसेच चाहते या फोटोवर कमेंट्स करत आहेत आणि अनन्याचे तोंड भरुन कौतुक करत आहेत.

 

अनन्याच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं, तर अनन्याने ‘स्टुडन्ट ऑफ द इयर २’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर ती ‘पती पत्नी और वो’मध्ये भूमी पेडणेकर आणि कार्तिक आर्यन यांच्यासोबत दिसली होती. सध्या ती विजय देवरकोंडासोबत तिच्या आगामी चित्रपटाचं शूटिंग करत आहे. याशिवाय ती शकुन बत्राच्या चित्रपटात दीपिका पादुकोण आणि सिद्धांत चतुर्वेदीसोबतही दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-मुघलांना ‘डाकू’ म्हटल्यामुळे ‘या’ कलाकारांच्या निशाण्यावर आले मनोज मुंतशीर; ऋचा म्हणतेय, ‘खूपच बकवास…’

-तरुणींनाही लाजवेल असं आहे तिचं सौंदर्य! पाहा सिल्व्हर आऊटफिटमध्ये श्वेता तिवारीचा ग्लॅमरस अंदाज

-‘बिग बीं’च्या घरात निर्माण झालीय पाण्याची समस्या? ब्लॉगमध्ये कामाबद्दल व्यक्त केली चिंता

हे देखील वाचा