कलाकार आपल्या आयुष्यात दमदार अभिनयाने यशाचे शिखर गाठतात. अशात छोटा पडदा असो वा मोठा पडदा दोन्हींमधील कलाकार आपल्या अभिनयाने चाहत्यांच्या मनावर आपला ठसा उमटवीत असतात. काहींना लहान वयामध्येच मोठ्या अनुभवांना सामोरे जावे लागते. पुस्तकी ज्ञानापेक्षा माणूस अनुभवातून जास्त शिकतो असं म्हणतात. अशाच लहान वयातील अनुभवांमधून आपल्या अभिनयात छोट्या आणि मोठ्या पडद्यावर दमदार भूमिका साकारणारी अभिनेत्री अचिंत कौर. रविवारी (५ सप्टेंबर) ती तिचा वाढदिवस साजरा करते. यानिमित्ताने जाणून घेऊयात तिचा जीवनप्रवास.
अचिंतचा जन्म ५ सप्टेंबर १९७३ रोजी उत्तर प्रदेशमध्ये झाला. तिने ४८व्या वयात पदार्पण केले आहे. अभिनेत्री कायमच आपल्या दमदार अभिनयासह, हटके फोटोंमुळे देखील नेहमीच चर्चेत असते. तिचे चाहते तिच्या नवीन फोटोंची आतुरतेने वाट पाहत असतात. वेगवेगळ्या लूकमधल्या फोटोंनी ती चाहत्यांना घायाळ करत असते. अभिनेत्री तिच्या फिटनेसमुळे देखील ओळखली जाते. वयाच्या अट्ठेचाळीशीमध्ये देखील ती खूप तरुण वाटते. (Actress Anchit Kaur had an marriage in 18 years of age on screen mother in law is the mother of a son)
अचिंत एका मुलाची आई आहे. परंतु तिच्या फिटनेसमुळे चाहत्यांना यावर विश्वासच बसत नाही. अभिनेत्रीचे वयाच्या अवघ्या १८व्या वर्षी लग्न झाले. तिने आपल्या कुटुंबीयांनी पसंत केलेल्या मुलाशी लग्न केले होते. याची माहिती तिने स्वतः एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितली होती. परंतु तिने काही कारणास्तव आपल्या पती बरोबर घटस्फोट घेतला. त्याचे कारण तिने अद्याप स्पष्ट केलेले नाही. अभिनेत्रीने सांगितले होते की, “लग्न न टिकण्याची खूप करणे आहेत. परंतु आम्ही दोघांनी शांततेने वेगळे होण्याचा विचार केला आणि घटस्फोट घेतला. आमचा घटस्फोट झालेला असला, तरी देखील आम्ही आजही एकमेकांचे खूप चांगले मित्र आहोत.” अचिंत घटस्फोटानंतर टीव्ही ऍक्टर मोहन कपूरबरोबर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होती. दरम्यान त्यांच्या या नात्याची नेटकऱ्यांमध्ये चांगलीच चर्चा रंगली होती.
अभिनेत्रीने साल १९९४ मध्ये आपल्या अभिनयातील कारकिर्दीला सुरुवात केली. तिची पहिली मालिका ‘बनेगी अपनी बात’ ही होती. या मालिकेमधून तिला रसिक प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले. या मालिकेमधूनच तिचा अभिनय क्षेत्रातील यशाचा आलेख चढता राहिला. त्यानंतर तिने अनेक मालिका आणि कार्यक्रमांमध्ये काम केले. तिने ‘पिया का घर’, ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’, ‘कहानी घर घर की’, ‘करम अपना अपना’ अशा मालिकांमध्ये दमदार भूमिका साकारल्या. तसेच ‘जूली’, ‘हीरोइन’, ‘ओम जय जगदीश’, ‘गुजारिश’, ‘२ स्टेट्स’ अशा चित्रपटांमध्ये देखील ती झळकली. अभिनेत्रीने आजवर अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. परंतु तिच्या पहिल्या मालिकेतील दुर्गा देवी पटेल ही भूमिका आजची चाहत्यांच्या मनात घर करून आहे.
तिच्या वाढदिवसानिमित्त तिच्या अनेक चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. अनेकांनी तिच्या दीर्घ आयुष्याची प्रार्थना केली आहे. अभिनेत्रीने चाहत्यांचे प्रेम फक्त अभिनयातून नाही, तर तिच्या हटके फोटोंमुळे देखील मिळवले आहे.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-कैसे भुलू तुझे! सिद्धार्थच्या निधनाने अजून ही धक्क्यात आहे आसीम; सतत पाहतोय दोघांचे व्हिडिओ
-सायरा बानूंची आयसीयूमधून झाली मुक्तता; डिप्रेशन अन् ऍंजिओग्राफीबद्दल खुलासा करत डॉक्टर म्हणाले…










