Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

ज्यांनी लता मंगेशकरना पाकिस्तान बॉर्डर वर खाऊ घातली होती बिर्याणी; त्या सुरेल आवाजाच्या नूरजहाँ यांची आज पुण्यतिथी…

ज्यावेळी भारत आणि पाकिस्तान या दोन देशांची विभागणी झाली नव्हती. सीमा नव्हत्या. तेव्हा २१ सप्टेंबर १९२६ ला लाहोरपासून ४५ किलोमीटर अंतरावर असलेल्या कसूरमध्ये एका मुलीचा जन्म झाला. नाव अल्ला राखी वसाई. अल्ला राखी जेव्हा मोठ्या झाल्या तेव्हा त्यांनी आपल्या सुरेल आवाजाने सर्वांची मने जिंकली. त्या खूप सुंदर होत्या आणि त्यांच्यात अभिनय प्रतिभा नैसर्गिकरित्या आली होती. पुढे त्यांना सिनेजगतात नूरजहाँ या नावाने ओळखले जाऊ लागले. त्याच नूरजहाँची आज पुण्यतिथी आहे. फाळणीनंतर नूरजहाँ आपल्या पतीसोबत पाकिस्तानात गेल्या. पण, त्याच्या आवाजाचा दणदणाट आजही दोन्ही देशात कायम आहे. त्यांच्याबद्दल जाणून घेऊया…

नूरजहाँने जवळपास सात दशके चाहत्यांच्या हृदयावर राज्य केले. त्या जेव्हा पाकिस्तानात गेल्या तेव्हा त्या भारतातील खूप प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री होत्या. ‘दोस्त’, ‘झीनत’, ‘बडी मां’, ‘जुगनू’, ‘खानदान’ यांसारख्या चित्रपटांनी त्या भारतातील प्रत्येक घराघरात ओळखल्या गेल्या. नूरजहाँने महान होण्यासाठी खूप कष्ट केले आणि स्वतःच्या अटींवर आयुष्य जगले. त्यांच्या आयुष्यात चांगली-वाईट वळणे आली, त्यांनी लग्न केले, घटस्फोट घेतला, प्रेमप्रकरण होते, प्रसिद्धी मिळवली आणि आयुष्याच्या शेवटच्या क्षणी त्यांन  खूप त्रासही सहन करावा लागला.

गायिका बनण्यासोबतच नूरजहाँ एक उत्तम अभिनेत्री बनल्या. १९३० मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘हिंद के तारे’ या चित्रपटातून त्यांनी पदार्पण केले आणि एका वर्षातच त्यांनी एक लोकप्रिय बालकलाकार म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली. 1930 ते 1947 पर्यंत त्यांनी स्वत:ला एक उत्तम अभिनेत्री तसेच गायिका म्हणून प्रस्थापित केले. त्यांनी केवळ  त्यांनी फक्त कोलकात्यातच काम केले नाही तर मुंबई आणि लाहोरमध्येही काम केले. मात्र भारत आणि पाकिस्तानच्या फाळणीच्या वेळी शौकत रिझवी यांनी शेजारच्या देशात जाण्याचा निर्णय घेतला होता, त्यानंतर नूरजहाँही आपल्या पतीसोबत पाकिस्तानमध्ये राहिल्या. मात्र, पाकिस्तानात गेल्यानंतर त्यांनी आपले काम सुरूच ठेवले आणि तेथेही अनेक चित्रपटांमध्ये काम केले. इतकेच नाही तर नूरजहाँने पाकिस्तानात जाऊन ‘चेनवे’ चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन केले.

पाकिस्तानात गेल्यानंतर नूरजहाँने ‘गुलनार’, ‘फतेखान’, ‘लख्ते जिगर’, ‘इंतेजार’, ‘अनारकली’, ‘परदेसियां’, ‘कोयल’ आणि मिर्झा गालिब यांसारख्या चित्रपटांमध्ये अभिनय करून प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले. 1963 मध्ये त्यांनी अभिनय जगताला अलविदा केला. इंडस्ट्रीत असताना त्यांनी 10 हजारांहून अधिक गाणी गायली होती, असे म्हटले जाते. 23 डिसेंबर 2000 रोजी नूरजहाँनी या जगाचा निरोप घेतला.

लता मंगेशकर यांना जेवणाची खूप आवड होती. नूरजहाँ स्वतःच्या हाताने बनवलेली बिर्याणी घेऊन त्यांना भेटायला आल्या होत्या. लताजींना ती बिर्याणी खायची होती. मात्र सीमेपलीकडून कोणत्याही मालाची देवाणघेवाण करणे शक्य नव्हते. पण, लताजी आणि नूरजहाँ यांच्या सांगण्यावरून दोघेही वाघा बॉर्डरवर असलेल्या नो मॅन्स लँडवर पोहोचले आणि दोघांनी बिर्याणी खाल्ल्याचे सांगितले जाते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा

बोनी कपूरना बनवायचा होता एक रोमांटीक चित्रपट; दिलजित आणि प्रियांकाची जोडी झाली होती फायनल…

हे देखील वाचा