Friday, July 12, 2024

अंकिता लोखंडेने पती विकीपासून लपवली आहे ही गोष्ट, ‘लॉकअप’ शोमध्ये सांगितले मोठे रहस्य

सध्या अभिनेत्री कंगणा रणौतच्या (Kangana Ranaut) लॉकअप कार्यक्रमाची सर्वत्र चर्चा रंगली आहे. या कार्यक्रमात रोज नवनवे खुलासे होताना दिसत आहेत. कार्यक्रमात पूनम पांडे (Poonam Pandey) पायल रोहतगी (Payal Rohatagi) अशा अनेक चर्चेत असणाऱ्या अभिनेत्री सहभागी आहेत त्यामुळेच या कार्यक्रमाची रंगत वाढताना दिसत आहे.सध्या कार्यक्रमाचा एक प्रोमो व्हिडिओ व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होत आहे ज्यामध्ये प्रसिद्ध टिव्हि अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande)  कार्यक्रमात सहभागी झालेली दिसत आहे. ज्यामध्ये तिने कंगणासोबत चांगलीच धमाल उडवली आहे. सध्या हा प्रोमो सर्वत्र व्हायरल होत आहे.

याबाबत संपूर्ण माहिती अशी की, अंकिता लोखंडे कंगना राणौतच्या ‘लॉक अप’ शोच्या आगामी भागात दिसणार आहे. शोच्या लेटेस्ट प्रोमोमध्ये अंकिता कंगनाच्या शोमध्ये सहभागी होताना दिसत आहे. प्रोमोमध्ये कंगना ‘आज आमच्या लॉकअपमध्ये एक पाहुणे आला आला आहे असे म्हणत अंकिता लोखंडेच्या नावाची घोषणा करताना दिसत आहे. यानंतर अंकिता तिच्या लोकप्रिय ‘पवित्र रिश्ता’ मालिकेबद्दल बोलताना दिसत आहे. यावेळी कार्यक्रमात मुनव्वर फारुकी आणि अंजली अरोरा यांचे नाव घेत कंगनाच्या शोमध्ये ‘नवीन नाते कसे तयार होत आहे याबद्दल ती बोलते. ती त्यांच्या केमिस्ट्रीची प्रशंसा करते आणि त्यांना क्यूट म्हणत त्यांचे कौतुकही करताना दिसत आहे.

यानंतर, कंगना अंकिताला सांगते की, येथे एक रहस्य उघड करण्याची प्रथा आहे आणि तिला स्वतःशी संबंधित एक रहस्य सांगण्यास सांगते. अंकिता लोखंडेने ज्या जे रहस्य सांगितले ये या व्हिडिओमध्ये सांगितले नाही मात्र ती तिचा पती विकी जैन यालाही तिचे रहस्य माहित नाही असे यावेळी म्हणते. त्यामुळेच कार्यक्रमात अंकिताचे गुपित कळल्यानंतर कंगनाच्या प्रतिक्रियेने सर्वांची उत्कंठा वाढली आहे. कंगनी आपले आश्चर्य लपवू शकली नाही. दरम्यान, अंकिताने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर फोटोही शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती कंगनासोबत पोज देताना दिसत आहे.

कॅप्शनमध्ये अंकिताने ‘लॉक अप’मध्ये जाऊन किती आनंद झाला याबद्दल सांगितले आहे. अंकिताने फोटोसोबत कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘तुझ्या जेलमध्ये घालवलेला प्रत्येक क्षण मला खूप आवडला. कंगना रणौत आणि एकता कपूर, मजा आली. कमेंटमध्ये हार्ट इमोजी देखील शेअर करण्यात आला आहे. अंकिता लोखंडे सध्या पती विकी जैनसोबत स्टार प्लस च्या ‘स्मार्ट जोडी’मध्ये दिसत आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा