अभिनेत्री अंकिता लोखंडे नेहमीच चर्चेत असते. कधी तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल, तर कधी तिच्या व्यावसायिक आयुष्याबद्दल. अंकिता सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते. त्याचबरोबर ती आपल्या चाहत्यांबरोबर सतत आपले फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. चाहते देखील तिच्या पोस्टची आतुरतेने वाट पाहत असतात. तिने नुकतेच आपले काही लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत. जे सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.
अंकिताला पारंपरिक कपडे घालण्याची खूप आवड आहे. यावेळी तिने असेच काहीसे फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये तिने गुलाबी रंगाचा घागरा परिधान केला आहे. यामध्ये ती एखाद्या अप्सरेपेक्षा कमी दिसत नाहीये. अंकिताने हे सुंदर फोटो शेअर करताना छान असे कॅप्शन देखील दिले आहे. तिने लिहिले की, “माझ्या आयुष्यात केवळ कल्पना आहेत.” फोटोंमध्ये अंकिता वेगवेगळ्या पोझ देताना दिसत आहे. काही फोटोमध्ये ती तिची स्टाइल दाखवत आहे, तर काही फोटोमध्ये ती लाजताना पोझ देत आहे.
अंकिताच्या फोटोंना लाखो चाहत्यांनी लाइक केले आहे. चाहते आणि सेलिब्रिटी स्वत:ला कमेंट करण्यापासून रोखू शकत नाहीत. यावर दलजीत कौरने कमेंट केली की, “तुझ्या सर्व सुंदर कल्पना खऱ्या होऊदे.” त्याचबरोबर अंकिताचे चाहतेही कमेंट करत आहेत. एका चाहत्याने लिहिले की, “तुझे स्मित.” तसेच हार्ट इमोजी पोस्ट केले आहेत. तर दुसऱ्या एका चाहत्याने लिहिले की, “तू खूप सुंदर आहेस.”
अंकिताने ‘पवित्र रिश्ता’ या शोमधून तिच्या करिअरची सुरुवात केली होती. या शोमध्ये अंकिता अर्चनाच्या भूमिकेत दिसली होती. या व्यक्तिरेखेतील अंकिता प्रेक्षकांना खूप आवडली. या शोमध्ये तिच्यासोबत दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपुत दिसला होता.
वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर अंकिता ‘पवित्र रिश्ता २’मध्ये शाहीर शेख सोबत दिसत आहे. या शोमध्ये देखील अंकिताला खूप पसंती मिळाली आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-अरे बापरे! अंकिता लोखंडेला नक्की झाले काय ‘भाड में गया ए प्यार व्यार’ म्हणायला?
-बॉयफ्रेंड विकी जैनच्या मिठीत दिसली अंकिता, रोमॅंटिक फोटोंचा कोलाज व्हिडिओ व्हायरल
-‘आमच्या पहिल्या भेटीतच त्याने…’, अंकिताने दिला सुशांतच्या जुन्या आठवणींना उजाळा