Friday, July 5, 2024

बॉयफ्रेंडसोबत होळीच्या रंगात रंगली अंकिता लोखंडे, रोमँटिक गाण्यावर लावले जोरदार ठुमके

बॉलिवूडमधील सगळेच कलाकार होळीच्या रंगात रंगताना दिसत आहेत. होळी साजरी करतानाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होताना दिसत आहेत. यातच टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडेने देखील तिच्या सोशल मीडियावर अकाउंटवर होळीचे फोटो शेअर केले आहेत. तिच्या या फोटोला नेहमी प्रमाणेच प्रेक्षकांची पसंती मिळताना दिसत आहे. या फोटोत ती तिचा बॉयफ्रेंड विकी जैनसोबत दिसत आहे.

अंकिता लोखंडेने तिच्या बॉयफ्रेंडसोबत होळी खेळतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये विकी आणि अंकिता एकमेकांना रंग लावताना दिसत आहेत. तसेच बॅकग्राउंडला ‘होली के दीन मील जाते हैं’ हे गाणे वाजत आहे. असे दोन व्हिडिओ शेअर करत अंकिताने ‘हॅप्पी होली’ असे कॅप्शन लिहिले आहे.

व्हिडिओमध्ये अंकिता आणि विकी जोरदार डान्स करताना दिसत आहे. तसेच तुम्ही बघू शकता की, रंग लावल्यानंतर अंकिता विकीच्या पाया पडते. तिच्या या व्हिडिओला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद येत आहे. अंकिता या व्हिडिओमध्ये विकीसोबत खूपच खुश दिसत आहे.

अंकिताने नुकतेच कुंडली भाग्यमधील प्रिता म्हणजेच श्रद्धा आर्या हिच्या सोबतचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले होते. अंकिता आणि श्रद्धाच्या मैत्रीला प्रेक्षकांनी खूपच प्रेम दिले. अनेकजण त्यांच्या या फोटोवर कमेंट देखील करत आहेत. काहीजण त्यांच्या 16 वर्षांच्या मैत्रीला शुभेच्छा देताना दिसत आहेत. एका युजरने तर असे लिहिले की, ‘आता पवित्र रिश्ता तर तुटला, आता वेळ आहे कुंडली भाग्यची.’ अशा वेगवेगळ्या कमेंट प्रेक्षकांनी केल्या आहेत.

नुकतेच अंकिताने एका मुलाखतीदरम्यान सर्वांनाच हैराण केले होते. तिने मुलाखतीमध्ये दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतसोबतच्या आपल्या नात्यावर मोकळेपणाने चर्चा केली होती. परंतु, तिच्या मुलाखतीदरम्यानच्या काही गोष्टी सुशांतच्या चाहत्यांना पटल्या नव्हत्या. त्यामुळे तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-दिलजीतने शेअर केला मुलासोबतचा मजेशीर व्हिडिओ, सेलेब्सनी विचारले ‘आई कुठे आहे?’

-मराठमोळी जोडी रितेश अन् जेनेलियाही रंगले होळीच्या रंगात, रोमँटिक व्हिडिओ शेअर करत दिल्या शुभेच्छा!!

-इरफान खानच्या आठवणीत मुलगा बाबिल झाला भावुक; वडिलांचे कपडे परिधान करत दिला आठवणींना उजाळा

हे देखील वाचा