Wednesday, August 6, 2025
Home अन्य व्हिडिओ: आपल्या बॉयफ्रेंडसोबत पॅपराजींच्या कॅमेऱ्यात अंकिता लोखंडे कैद; आनंदाने साधला त्यांच्याशी संवाद

व्हिडिओ: आपल्या बॉयफ्रेंडसोबत पॅपराजींच्या कॅमेऱ्यात अंकिता लोखंडे कैद; आनंदाने साधला त्यांच्याशी संवाद

टीव्ही मालिका ‘पवित्र रिश्ता’ फेम अभिनेत्री अंकिता लोखंडे ही आपल्या अभियनाने घराघरात पोहोचली आहे. त्यामुळे तिचे फॅन फॉलोविंग बॉलिवूडमधील कोणत्या अभिनेत्रीपेक्षा कमी नाही. अंकिता ही सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिच्या चाहत्यांना इम्प्रेस करण्याची एकही संधी ती सोडत नाही. नवनवीन गोष्टी प्रेक्षकांसाठी ती नेहमीच शेअर करत असते. काही दिवसांपूर्वी सुशांत सिंग राजपूतच्या पुण्यतिथीनिमित्त तिने एक पोस्ट केली होती. त्यात तिने त्या दोघांचा संपूर्ण प्रवास दाखवला होता. त्याच्याच दुसऱ्या दिवशी तिने तिचा बॉयफ्रेंड विकी जैनबाबत एक खूप मोठी पोस्ट शेअर केली होती. तिच्या चाहत्यांना तिच्या वैयक्तिक आयुष्यात खूप रस आहे. तिच्या प्रत्येक गोष्टीची ती अपडेट देखील देत असते. अशातच तिचा एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये ती तिच्या बॉयफ्रेंडसोबत दिसत आहे. (Actress Ankita lokhande spot with her boyfriend, video get viral)

व्हायरल भयानीने त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून अंकिताचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, अंकिताला बघून तिथे असलेले पॅपराजी तिचे फोटो आणि व्हिडिओ काढू लागतात. ती खूप आनंदाने सर्वांना भेटते. त्यांच्याशी आनंदाने हसत संवाद साधल्यानंतर ती तिच्या कारमध्ये जाऊन बसते. जिथे आधीच विकी बसलेला असतो. तिचा हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 90 हजारपेक्षाही जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.

नुकतेच अंकिता ‘बिग बॉस 15’ मध्ये स्पर्धक असणार आहे, अशी बातमी समोर आली होती. मात्र, अंकिताने ही बातमी खोटी असल्याची माहिती दिली आहे. तसेच ती ‘पवित्र रिश्ता 2.0’ मध्ये देखील असणार आहे. या मालिकेत ती पुन्हा एकदा अर्चनाचे पात्र निभावणार आहे, तर मानवचे पात्र अभिनेता शहीर शेख निभावणार आहे. परंतु या शोच्या निर्मात्यांनी याबाबत कोणतीही घोषणा केली नाही.

अंकिताने ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेत दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतसोबत मुख्य भूमिकेत काम केले होते. या मालिकेतील त्यांचे मानव आणि अर्चना नावाचे पात्र खूप गाजले होते. यानंतर अंकिताने बॉलिवूडमध्ये पाऊल टाकले. तिने ‘मनिकर्णिका‌’या चित्रपटात काम केले. तसेच ती ‘बागी 3’ मध्ये देखील दिसली होती. या चित्रपटात तिने श्रध्दा कपूर, टायगर श्रॉफ आणि रितेश देशमुख सोबत काम केले होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-नादच खुळा! श्रीदेवीची लाडकी लेक बनलीय ‘लालपरी’, फोटोवर बहीण सोनमसह इतर मैत्रिणींच्या हटके कमेंट्स

एका फोटोत केले चक्रासन, तर दुसऱ्यात पडलीय बेडवर; पाहा दीपिकाचे ‘एक्सपेक्टेशन वर्सेस रियॅलिटी’

-अभिमानास्पद! ‘स्त्री शक्ती राष्ट्रीय पुरस्कार २०२१’ने उर्वशी रौतेलाचा गौरव; फोटो अन् व्हिडिओ केला शेअर

हे देखील वाचा