Wednesday, March 12, 2025
Home मराठी ‘अगर हम शायर होते तो…’ अनुजा साठेच्या ग्लॅमरस फोटोवरील चाहत्याची कमेंट ठरतीय लक्षवेधी

‘अगर हम शायर होते तो…’ अनुजा साठेच्या ग्लॅमरस फोटोवरील चाहत्याची कमेंट ठरतीय लक्षवेधी

अनेक मराठी मालिका आणि चित्रपटात काम करून नावारूपाला आलेली अभिनेत्री म्हणजे अनुजा साठे. तिने पुढे तिच्या अभिनयाचा प्रवास हिंदी टेलिव्हिजन आणि चित्रपटाकडे देखील वळवला. तिथे देखील तिच्या अभिनयाचे प्रेक्षकांनी चांगलेच चांगलेच कौतुक केले. अनुजा एक विविध गुणसंपन्न असणारी अभिनेत्री आहे. तिने अगदी साध्या भूमिकांपासून ते अत्यंत बोल्ड भूमिका साकारल्या आहेत. अनुजा तिच्या आयुष्यात फिटनेसला‌ खूप महत्व देते. अनेकवेळा तिचे जिममधील फोटो आणि व्हिडिओ ती शेअर करत असते. अशातच तिचा एक ग्लॅमरस फोटो समोर आले आहे.

अनुजाने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये आपण पाहू शकतो की, अनुजा एका गाडीवर बसलेली आहे. तिने लाल रंगाची पँट आणि काळ्या रंगाचा टॉप घातला आहे. तसेच तिच्यावर लाल रंगाची लाईट पडली आहे. त्यामुळे तिचा हा लूक खूपच सुंदर दिसत आहे. फोटोमध्ये तिने दिलेली पोझ देखील खूप छान दिसत आहे. (Actress Anuja sathe share her photo on social media)

तिचा हा लूक तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. अनेकजण या फोटोवर त्यांचा प्रतिक्रिया देत आहेत. तिच्या एका चाहत्याने या फोटोवर कमेंट केली आहे की, “अगर हमे लिखणा आता तो, तेरी तारीफ बेसुमार लिखते. अगर हम शायर होते तो, तेरे हुस्न पण किताब लिखते.” तसेच बाकी अनेक चाहते या फोटोवर त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. अनुजाचा प्रत्येक पोस्टला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असतो.

अनुजाच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने अनेक हिंदी आणि मराठी मालिकांमध्ये काम केले आहे. तिने ‘पेशवा बाजीराव’, ‘तमन्ना’, परमाणू’, ‘झाँसी की राणी’, ‘बाजीराव मस्तानी’ या हिंदी चित्रपटात आणि मालिकांमध्ये काम केले आहे. तसेच तिने मराठीमध्ये ‘व्हाट्सऍप लग्न’, ‘राखणदार’, ‘मी पण सचिन’, ‘भो भो’, ‘घंटा’, ‘मांडला दोन घडीचा डाव’, ‘लगोरी’ या मराठी मालिका आणि चित्रपटात काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

सनी लिओनीची लाडकी लेक झाली सहा वर्षांची, वाढदिवसानिमित्त गोंडस फोटो केले शेअर

आदेशानंतरही ईडीच्या कार्यालयात हजर नाही झाली जॅकलिन, एजंसीने बजावला तिसरा समन्स

भारीच ना! ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या निर्मात्यांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय, ऐकून नाचू लागतील चाहते

हे देखील वाचा