Friday, July 5, 2024

अनुष्का अन् विराटने लंडनमध्ये घेतला जेवणाचा आस्वाद; पाहून तुमच्याही तोंडाला सुटेल पाणी

मनोरंजन तसेच क्रीडाविश्वातील सर्वात रोमँटिक जोडप्यांमध्ये अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीची गणना होते. साल २०१७ मध्ये या दोघांनी विवाह केला. तेव्हापासून क्रिकेटप्रेमी व नेटकऱ्यांसाठी हे जोडपे कायमच चर्चेचा विषय असतात. अनुष्काने आपल्या चित्रपटातील कारकिर्दीला २००८ मध्ये ‘रब ने बना दी जोडी’ या चित्रपटातून सुरुवात केली. तेव्हापासून ती चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. अनुष्का आणि विराटच्या लग्नानंतर त्यांच्या चाहत्यांना त्यांना कायमच एकत्र बघायला फार आवडते. त्यामुळे हे जोडपं नेहमी एकमेकांच्या सुख दुःखात साथ देत आपल्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर सक्रिय असतात. नुकतेच अनुष्काने त्या दोघांचे लंडनमध्ये शाकाहारी जेवणाचा आस्वाद घेतानाचे फोटो शेअर केले आहेत. हे पाहून तुमच्याही तोंडाला पाणी सुटेल.

विराट लंडन दौऱ्यावर पत्नी अनुष्कासोबत आला आहे. या जोडप्याने लंडनमधील आपले फोटो यापूर्वी शेअर केले होते. अशातच आता अनुष्काने लंडनमधील एका हॉटेलमध्ये ते दोघे जेवणाचा अस्वाद घेत असतानाचे फोटो आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर पोस्ट केले आहेत.

Photo Courtesy: Instagram/anushkasharma

चाहत्यांची त्यांच्या या फोटोंना चांगलीच पसंती मिळत आहे. त्याचबरोबर प्रसिद्ध आचारी रिशिम सचदेवा यांनी देखील त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर स्टार कपलबरोबरचे फोटो पोस्ट केले आहेत. या दोघांनी तेथील स्टाफबरोबर सुद्धा फोटो काढले आहेत. चाहत्यांनी या फोटोंवर तूफान लाईक्सचा वर्षाव केला आहे.

लॉर्ड्स मैदानावर इंग्लंडविरुद्ध झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यामध्ये भारताने विजय मिळवला. यावेळी विराटच्या टीमने दमदार प्रदर्शन केले. मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, इशांत शर्मा आणि जसप्रीत बुमराह यांनी इंग्लंडच्या २० पैकी १९ विकेट्स घेतल्या. विराटच्या टीम इंडियाने लॉर्ड्स कसोटीत इंग्लंडचा १५१ धावांनी पराभव केला. भारत सध्या ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-० ने आघाडीवर आहे.

अनुष्काने फेब्रुवारी महिन्यात वामिकाला जन्म दिला होता. अनुष्का आणि विराट नेहमीच आपापल्या कामात व्यस्त असतात. मात्र, ते नेहमीच कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी नेहमीच वेळ काढत असतात.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-सोनाली कुलकर्णीने ‘बैरागी…बैरागी का सूती चोला…ओढ़के चली…’ म्हणत सोशल मीडियावर घातला धुमाकूळ

-अंतरा मारवाहच्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाला संपूर्ण कपूर कुटुंबाची हजेरी, कपूर सिस्टर्सने केली धमाल

-नलूच्या शालूमुळे मालिकेची पोलखोल, ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ मालिकेच्या सीनमध्ये झाली मोठी चूक

हे देखील वाचा