Thursday, June 12, 2025
Home बॉलीवूड सकाळच्या कोवळ्या उन्हात खुलले अनुष्काचे सौंदर्य, आकर्षक फोटो शेअर करत म्हणाली, ‘मी गुड लाईटची…’

सकाळच्या कोवळ्या उन्हात खुलले अनुष्काचे सौंदर्य, आकर्षक फोटो शेअर करत म्हणाली, ‘मी गुड लाईटची…’

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माच्या अभिनय कौशल्याची सर्वांनाच कल्पना आहे. आपल्या प्रत्येक चित्रपटातील प्रत्येक पात्राने तिने प्रेक्षकांच्या हृदयात स्थान निर्माण केले आहे. आता अनुष्का शर्मा पुनरागमनासाठी सज्ज झाली आहे. ती ‘चकदा एक्सप्रेस’ या चित्रपटातून पुनरागमन करणार आहे. अनुष्काने काही काळापूर्वी या चित्रपटाची घोषणा केली होती आणि आता तिने त्याची तयारी सुरू केली आहे. अनुष्का सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. ती अनेकदा तिचे लेटेस्ट फोटो फॅन्ससोबत शेअर करत असते.

नुकतेच अनुष्का शर्माने (Anushka Sharma) तिच्या इंस्टाग्रामवर तिचे काही सुंदर फोटो शेअर केले आहेत. जे तिच्या चाहत्यांना खूप आवडत आहेत. या फोटोंमध्ये नेहमीप्रमाणे अनुष्का खूपच सुंदर दिसत आहे आणि तिचा चेहरा चमकत आहे. हे फोटो शेअर करताना अभिनेत्रीने दिलेले कॅप्शनही चाहत्यांना आवडत आहे.

अनुष्का शर्माने तिच्या लेटेस्ट फोटोंमध्ये पांढऱ्या रंगाचा इनर आणि वरून हिरवा स्वेटर परिधान केला आहे. अनुष्काने एकामागून एक तिचे अनेक फोटो शेअर केले आहेत. फोटोमध्ये अनुष्का कधी खुर्चीवर बसलेली आहे, तर कधी बाल्कनीत पोझ देत आहे. अनुष्का सुंदर असली तरी तिच्या चेहऱ्यावर पडणारे ऊन तिला आणखी सुंदर बनवत आहे. फोटो शेअर करताना अभिनेत्रीने त्याच्या कॅप्शनमध्ये “मी गुड लाईटची फॅन आहे” असे लिहिले आहे. या पोस्टला अल्पावधीतच जवळपास १० लाख लाईक्स मिळाले आहेत.

अनुष्का शर्माच्या या लेटेस्ट पोस्टवर चाहत्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत कमेंट येत आहेत. अदिती राव हैदरी आणि झोया अख्तर देखील स्मायली इमोजी पोस्ट केल्या आहेत. विशेष म्हणजे, अनुष्का शर्मा ही एक प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री आहे, जिने ‘दिल धडकने दो’, ‘सुलतान’, ‘जीरो’, ‘रब ने बना दी जोडी’, ‘जब हॅरी मेट सेजल’, ‘ए दिल है मुश्किल’, ‘परी’, ‘सुई धागा’ आणि ‘फिलौरी’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. अनुष्का ही स्टार क्रिकेटर विराट कोहलीची पत्नी देखील आहे.

अनुष्का शर्मा शेवटची शाहरुख खानसोबत ‘जीरो’ या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात कॅटरिना कैफही मुख्य भूमिकेत होती. ‘जीरो’नंतर अनुष्काने कोणत्याही चित्रपटात काम केलेले नाही. ती चित्रपट आणि वेबसिरीजची निर्मिती करत आहे. तिने ‘पाताल लोक’ ही वेबसिरीज आणि ‘बुलबुल’ चित्रपटाची निर्मिती केली आहे. आता सर्वांनाच अनुष्काच्या पुनरागमनाची प्रतीक्षा आहे. यावेळी ती काय करणार असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. या चित्रपटाचा टीझर देखील प्रदर्शित झाला आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा :

हे देखील वाचा