विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहेत.या जोडप्यांना एक मुलगा आणि मुलगी आहे. त्यांचे नाव अकाय आणि वामिका हे आहे, तर त्यांचे वैयक्तिक आयुष्य यांनी खूप खाजगी ठेवले आहे. ते क्वचितच मीडियासमोर दिसतात, अलिकडेच सोशल मीडियावर एका हृदयस्पर्शी झलकाने चाहत्यांचे लक्ष वेधले आहे. या झलकांमध्ये विराट आणि अनुष्का त्यांच्या मुलांनसोबत फिरायला जाताना दिसत आहेत. तर या प्रेमळ क्षणावर चाहते प्रतिक्रिया देत आहेत.
विराट (virat)कोहलीला कॅज्युअल लूकमध्ये तो दिसत आहे. तर त्याचा मुलगा त्याच्यासोबत हात धरून चालत आहे, गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर फिरणाऱ्या व्हिडिओंमध्ये फक्त विराट आणि त्याचा मुलगा दिसत होते, तर आता आणखी एक झलक समोर आली आहे, ज्यामध्ये अनुष्का जवळच उभी आहे आणि तिची मुलगी वामिका हात धरून आहे. अनुष्का हिरवा ट्रेंच कोट घातलेला दिसत आहे. तिने काळ्या ट्राउझर्स आणि लोफर्सने तिचा लूक पूर्ण केला आहे.
फेब्रुवारी 2024 मध्ये मुलाच्या जन्मापासून, विराट आणि अनुष्का शर्मा यांनी त्यांच्या मुलांच्या चांगल्या संगोपनासाठी लंडनला त्यांचे मुख्य निवासस्थान बनवले आहे. या जोडप्याचे प्राथमिक ध्येय म्हणजे त्यांच्या मुलांना भारतातील सततच्या मीडियाच्या झलकांपासून दूर सामान्य जीवन देणे. या व्हिडिओमुळे लाखो चाहत्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले असले तरी, त्यामुळे पुन्हा एकदा सेलिब्रिटी मुलांच्या गोपनीयतेबद्दल वाद निर्माण झाला आहे. विराट आणि अनुष्का नेहमीच माध्यमांना त्यांच्या मुलांच्या गोपनीयतेचा आदर करण्याची, त्यांच्या चेहऱ्याचे फोटो प्रसिद्ध करू नयेत अशी विनंती करतात. अनुष्का बऱ्याच काळापासून चित्रपटांपासून दूर आहे. तर आजकाल, ती पूर्णपणे अध्यात्मात बुडाली आहे आणि अनेकदा वृंदावनमध्ये प्रेमानंद महाराजांना भेटायला जाते.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा










