Thursday, July 18, 2024

अन्विता फलटणकरने घेतली पहिली कार, सोशल मीडियावर फोटो शेअर करत म्हणाली, ‘पहिलं नेहमी खास असतं.’

अभिनेत्री अन्विता फलटणकर म्हणजेच ‘येऊ कशी कशी मी नांदायला’ मधील सगळ्यांची लाडकी स्वीटू आपल्या अभिनयामुळे घराघरात पोहचली आहे. प्रेक्षकांच्या मनात तिने घर केले आहे. सोशल मीडियावर देखील ती मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. अशातच अन्विताने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे. “पहिलं सगळ्यात खास असतं,” असं म्हणत तिने आपल्या अधिकृत अकाउंटवरून तिच्या पहिल्या गाडीचा फोटो शेअर करून आनंद व्यक्त केला.

प्रत्येकाच्या आयुष्यात आपण स्वतः घेतलेल्या पहिल्या गाडीचा आनंद वेगळाच असतो. तोच आनंद अन्विता झाला आहे. तिचा आनंद गगनात मावत नाहीये. तिच्या या नवीन गाडीबद्दल तिच्या चाहत्यांनी खूप अभिनंदन केले तसेच अनेक सेलिब्रेटीनी तिला अभिनंदन केल आहे. (actress anvita faltankar buy a first car of her life)

मागच्या काही काही दिवसांपासून अन्विता (anvita phaltankar) ‘येऊ कशी मी नांदायला’ या मालिकेत आपल्याला दिसत नाहीये. प्रदर्शित झालेल्या भागात अन्विता सारखीच दिसणारी पाठमोरी उभी करून प्रसंग चित्रित केल्याचे आपल्याला जाणून येते. असे सलग तीन-चार दिवस चालू आहे. लाईट आवाज यामुळे हा फरक सहज जाणून येत आहे.

अन्विता ही मुळची ठाण्यातली.अन्विताचे शिक्षण डीजी रुपारेल कॉलेजमधून पूर्ण झालं. शाळेत आणि कॉलेजमध्ये असताना सांस्कृतिक कार्यक्रमात ती नेहमीच सहभागी असायची. तिच्या अभिनयाची सुरुवात ‘टाईमपास’ या सिनेमातून झाली. त्यानंतर  ‘गर्ल्स ‘ या सिनेमातून सहाय्यक भूमिकेत दिसली. तिला विनोदाची उत्तम जाण आहे या सिनेमानंतर तिला ‘येऊ कशी मी नांदायाला’ ही मालिका मिळाली. ही तिची पहिली मालिका आहे.

हेही वाचा :

हे देखील वाचा